HW News Marathi
Covid-19

महाराष्ट्र पोलिसांच्या मदतीला CAPF च्या १० तुकड्या राज्यात दाखल

मुंबई | राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा तासागणिक मोठ्या प्रमाणात वाढत चालले आहे. सतत वाढत्या कोरोनाबाधितांच्या आकड्यामुळे राज्य सरकारची चिंता चांगलीच वाढली आहे. या परिस्थितीचा सर्वाधिक ताण सध्या अत्यावश्यक सेवा पुरवणाऱ्यांना बसत आहे. राज्यातील अशी तणावपूर्ण परिस्थिती सांभाळण्यासाठी महाराष्ट्र पोलीस दिवसरात्र झटत आहेत. मात्र आता पोलिसांनाही विश्रांतीची आवश्यकता आहे. म्हणून राज्यांकडून केंद्राकडे मदत मागण्यात आली होती. या मागणीनुसार आता केंद्राकडून राज्यातील पोलिसांच्या मदतीसाठी केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाच्या १० तुकड्या दाखल झाल्या आहेत. यांपैकी प्रत्येक तुकडीत 100 पोलीस आहेत. राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी याबाबतची अधिकृत माहिती दिली आहे.

“राज्य पोलिस दलाच्या मदतीसाठी केंद्राकडे केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाच्या २० कंपन्यांची मागणी राज्य सरकारकडून करण्यात आली होती. त्यापैकी १० तुकड्या महाराष्ट्रात दाखल आहेत. यामध्ये रॅपीड अॅक्शन फोर्सच्या ५, सीआयएसएफच्या ३ आणि सीआरपीएफच्या २ तुकड्यांचा समावेश आहे. राज्यातील पोलिसांना विश्रांतीची नितांत आवश्यकता आहे. त्याचप्रमाणे, येत्या काळात सणही आहेत. त्यामुळे कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी राज्याकडून केंद्राकडून पोलीस दलाच्या तुकड्यांची मागणी करण्यात आली होती”, राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी याबाबतची माहिती ट्विटरवरून दिली आहे.

“मुंबई, पुणे, मालेगाव, औरंगाबाद आणि अमरावती अशा ठिकाणी या तुकड्या पाठवण्यात आल्या आहेत. त्याचप्रमाणे, मुंबई पोलिसांना त्यांना आवश्यक त्या ठिकाणी या तुकड्या तैनात करता येऊ शकतात. येत्या काळात असणाऱ्या रमजान ईद, गणेशोत्सवासारख्या सर्व सणांमध्ये कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी आणि पोलिसांना थोडी विश्रांती मिळावी यासाठी केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाच्या तुकड्या मागवण्यात आल्या आहेत. त्यापैकी १० तुकड्या महाराष्ट्रात दाखल आहेत. उर्वरित तुकड्यादेखील लवकरच दाखल होतील”, असेही अनिल देशमुख यांनी सांगितले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कोल्हापूर जिल्हा सोमवारपासून ७ दिवसांसाठी लाॅकडाऊन! पालकमंत्री सतेज पाटील यांची घोषणा

News Desk

नोव्हेंबरपर्यंत महाराष्ट्र पुर्णपणे अनलॅाक होणार,राजेश टोपेंचे संकेत !

News Desk

साताऱ्यातील बावधनच्या बगाड यात्रेनंतर कोरोनाचा कहर ! पोलिस,भाविकांसह ६१ जणांना कोरोना…

News Desk