HW News Marathi
Covid-19

काँग्रेसच्या आमदारांच्या निधीतून १११ रुग्णवाहिका व ६१ लाख मास्कचे वाटप करणार !

मुंबई | माजी पंतप्रधान भारतरत्न राजीव गांधी पुण्यतिथीचे औचित्य साधून काँग्रेस पक्षाने विविध समाजोपयोगी उपक्रमांचा शुभारंभ केला आहे. कोरोनाच्या संकटकाळात नागरिकांच्या मदतीसाठी काँग्रेसच्या आमदारांच्या निधीतून १११ अॅम्ब्युलन्स देण्यात येणार असून यासंदर्भातील पत्रं आमदारांनी संबंधित जिल्हाधिकारी यांच्याकडे सुपूर्द केली आहेत. तसेच राज्यभरात ६१ लाख मास्कचे वाटप केले जाणार असल्याची घोषणा महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आज (२१ मे) केली आहे. माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या स्मृतीदिनानिमित्त महाराष्ट्र काँग्रेसतर्फे अभिवादन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

नाना पटोले म्हणाले की, राजीव गांधी हे दूरदृष्टीचे नेते होते. २० व्या शतकातच भारताला २१ व्या शतकाचे स्वप्न त्यांनी दाखवले आणि त्यादृष्टीने पाऊले उचलली. या दृष्ट्या नेत्यांवर विरोधी पक्षाने खोटे आरोप करुन त्यांना बदनाम करण्याचे काम जाणीवपूर्वक केले. आधुनिक भारताची पायाभरणी करणारे राजीव गांधी हे देशासाठी जगले आणि देशासाठीच त्यांनी प्राणाचे बलिदान दिले.

राजीव गांधींच्या हौतात्म्य दिनी हाच जनसेवेचा वारसा पुढे घेऊन जात काँग्रेसतर्फे राज्यभरात १११ अॅम्ब्युलन्स देण्यात येणार असून यासंदर्भातील पत्रं आमदारांनी संबंधित जिल्हाधिकारी यांच्याकडे सुपूर्द केली आहेत. तसेच राज्यभरात ६१ लाख मास्कचे वाटप केले जाणार आहे”, असे नाना पाटोले यांनी जाहीर केले आहे.

महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यावेळी बोलताना म्हणाले की, “राजीव गांधी हे सर्वांच्या अंतकरणातील व्यक्तीमत्व होते. आधुनिक भारत घडवणारे विचार, देशाची एकता, बंधुता अबाधित राखण्यासाठी ते आयुष्यभर झटले. त्यांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी दरवर्षी २१ मे हा दिवस दहशतवादविरोधी दिवस म्हणून पाळला जातो. सोनिया गांधी यांच्या आवाहनानुसार काँग्रेस कार्यकर्ते लोकांच्या मदतीसाठी सरसावले आहेत. कोरोनाच्या पहिल्या लाटेतही काँग्रेस कार्यकर्त्यांनी मोलाची मदत केली आणि आत्ताही मदतीचे हे कार्य जोमाने सुरु आहे.”

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

लॉकडाऊनमध्ये लोकांनी ‘या’ गोष्टी केल्या सर्वाधिक सर्च

News Desk

हॉटेलमध्ये जाताना आता या ७ नियमांचे पालन करावे लागणार

News Desk

HW Exclusive : अमोल मिटकरींची अजित पवार-शरद पवार यांच्याशी पहिली भेट कशी झाली

News Desk