HW News Marathi
Covid-19

राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा २० हजार २२८ पार, तर ३८०० जण बरे होऊन घरी

मुंबई | राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या २० हजार २२८ झाली आहे. आज ११६५ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. राज्यात आज ३३० कोरोनाबाधित रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत राज्यभरात ३८०० रुग्ण बरे झाले आहेत अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज (९ मे) दिली.

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या २ लाख २७ हजार ८०४ नमुन्यांपैकी २ लाख ०६ हजार ४८१ जणांचे प्रयोगशाळा नमुने कोरोना करिता निगेटिव्ह आले आहेत तर २० हजार २२८ जण पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात २ लाख ४१ हजार २९० लोक होम क्वारंटाईनमध्ये असून १३ हजार ९७६ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

आज राज्यात ४८ कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. एकूण संख्या ७७९ झाली आहे. मालेगाव शहरातील ८ मृत्यू हे २५ एप्रिल ते ८ मे २०२० या कालावधीतील आहेत. आज झालेल्या मृत्यूपैकी मुंबई मधील २७, पुण्यातील ९, मालेगाव शहरात ८, पुणे जिल्ह्यात १, अकोला शहरात १, नांदेड शहरात १ तर अमरावती शहरात १ मृत्यू झाला आहे.

आज झालेल्या मृत्यूंपैकी २१ पुरुष तर २७ महिला आहेत. आज झालेल्या ४८ मृत्यूपैकी ६० वर्षे किंवा त्यावरील २७ रुग्ण आहेत तर १८ रुग्ण हे वय वर्षे ४० ते ५९ या वयोगटातील आहेत. तर ३ जण ४० वर्षांखालील आहे. रुग्णांना असणाऱ्या इतर आजारांबाबत ९ जणांची माहिती अप्राप्त आहे. उर्वरित ३९ रुग्णांपैकी २८ जणांमध्ये (७२ टक्के) मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग, अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत.

राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या

  • मुंबई : १२,८६४ (४८९)
  • ठाणे: ११० (२)
  • ठाणे मनपा: ८०० (८)
  • नवी मुंबई मनपा: ७८९ (४)
  • कल्याण डोंबिवली मनपा: ३१६ (३)
  • उल्हासनगर मनपा: २०
  • भिवंडी निजामपूर मनपा: २१ (२)
  • मीरा भाईंदर मनपा: २०१ (२)
  • पालघर: ३२ (२)
  • वसई विरार मनपा: २१६ (९)
  • रायगड: ८९ (१)
  • पनवेल मनपा: १३७ (२)
  • ठाणे मंडळ एकूण: १५,५९५ (५२४)
  • नाशिक: ५०
  • नाशिक मनपा: ७३
  • मालेगाव मनपा: ४७२ (२०)
  • अहमदनगर: ५१ (२)
  • अहमदनगर मनपा: ०९
  • धुळे: ८ (२)
  • धुळे मनपा: ४२ (१)
  • जळगाव: १११ (१२)
  • जळगाव मनपा: २२ (२)
  • नंदूरबार: १९ (१)
  • नाशिक मंडळ एकूण: ८५७ (४०)
  • पुणे: ११८ (५)
  • पुणे मनपा: १९३७५(१४१)
  • पिंपरी चिंचवड मनपा: १३२ (३)
  • सोलापूर: ६
  • सोलापूर मनपा: १८४ (१०)
  • सातारा: ९८ (२)
  • पुणे मंडळ एकूण: २५१३ (१६१)
  • कोल्हापूर: १३ (१)
  • कोल्हापूर मनपा: ६
  • सांगली: ३२
  • सांगली मिरज कुपवाड मनपा: ३ (१)
  • सिंधुदुर्ग: ५
  • रत्नागिरी: १८ (१)
  • कोल्हापूर मंडळ एकूण: ७७ (३)
  • औरंगाबाद:५
  • औरंगाबाद मनपा: ४३७ (१२)
  • जालना: १२
  • हिंगोली: ५८
  • परभणी: १ (१)
  • परभणी मनपा: १
  • औरंगाबाद मंडळ एकूण: ५१४ (१३)
  • लातूर: २५ (१)
  • उस्मानाबाद: ३
  • बीड: १
  • नांदेड: ३
  • नांदेड मनपा: ३० (३)
  • लातूर मंडळ एकूण: ६२ (४)
  • अकोला: ९ (१)
  • अकोला मनपा: १३४ (१०)
  • अमरावती: ४ (१)
  • अमरावती मनपा: ७८ (११)
  • यवतमाळ: ९५
  • बुलढाणा: २४ (१)
  • वाशिम: १
  • अकोला मंडळ एकूण: ३४५ (२४)
  • नागपूर: २
  • नागपूर मनपा: २२२ (२)
  • भंडारा: १
  • गोंदिया: १
  • चंद्रपूर: १
  • चंद्रपूर मनपा: ३
  • नागपूर मंडळ एकूण: २३० (२)
  • इतर राज्ये: ३५ (८)

एकूण: २० हजार २२८ (७७९)

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अजित पवारांचं सगळं ऐकता मग ‘हे’ का ऐकत नाही?, सुप्रिया सुळेंकडून कार्यकर्त्यांची कानउघाडणी

News Desk

ऊर्जामंत्री नितीन राऊत यांना कोरोनाची लागण

News Desk

विद्यापीठ आणि महाविद्यालयांच्या परीक्षा युजीसीच्या सूचनेनंतरच निर्णय, उदय सामंत यांची माहिती

News Desk