HW News Marathi
महाराष्ट्र

अजित पवारांची ‘तंबी’, दोन डोस घेतले तरी नियम पाळावेच लागतील!

पुणे। देशासह राज्यात कोरोनाची दुसरी लाट ओसरत असताना पुन्हा कोरोनाबाधितांचा आकडा वाढू लागला आहे. तसेच केंद्र सरकारनेही महाराष्ट्र आणि केरळ सरकारला महत्वाच्या सूचना केल्या आहेत. कारण ५० टक्के रुग्णसंख्या वाढल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. आता तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोरोना या महाभयंकर आजाराचे नियम पाळावेच लागतील, असे स्पष्ट केले आहे. अन्यथा नियम मोडणाऱ्यांवर कारवाई केली जाईल. तर पुण्यात संध्याकाळी ४ वाजेपर्यंतच व्यवहार सुरू राहणार आहेत, हे लक्षात घ्या. तिसऱ्या लाटेची शक्यता गृहित धरून मुलांसाठी सुविधा, उभारत आहोत, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी दिली.

अजित पवार पुढे बोलताना असंदेखील म्हणाले दोन लसी घेतल्या तरी कोरोनाचे नियम पाळावेच लागेल. मृत्युदर कमी झाला आहे. तरीदेखील लोक मास्क वापरत नाहीत. दोन्ही डोस घेऊनही कोरोना होऊ शकतो. मृत्यू देखील झाला. त्यामुळे मास्क , सॅनिटायझर आवश्यक आहे, असे अजित पवार यांनी सांगितलेपुणे जिल्ह्यात आतापर्यंत ५० लाख नागरिकांचे लसीकरण झाले आहे. उद्या परवा लसीकरण होणार नाही. कारण लस उपलब्ध नाही.जोपर्यंत केंद्राकडून लस पुरवठा होत नाही तोपर्यंत लसीकरण सुरळीत होणार नाही, असे अजित पवार म्हणालेत. पुणे जिल्ह्याचा पॉझिव्हिटी रेट ६.२ वरून ६ वर आलाय. तिसऱ्या लाटेची शक्यता गृहीत धरून लहान मुलांसाठी सुविधा उपलब्ध करून देण्यात आली, असे ते म्हणाले.

तर पुण्यातील दुकाने सायंकाळीच बंद करावी लागणार आहेत. तर नंतर फेरीवाले, हातगाडीवाले रस्त्यावर दिसतात. त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असा स्पष्ट इशाराच अजित पवार यांनी दिला आहे. तसेच पर्यटन स्थळे बंदच आहेत. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई होईल. पुण्यात सध्या लागू असलेले निर्बंध यापुढेही सुरू राहतील, असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

कोरोनाची सद्यस्थिती-

देशात कोरोनाग्रस्तांच्या रुग्णसंख्येत चढउतार पाहायला मिळत आहेत. गेल्या २४ तासात आदल्या दिवसाच्या तुलनेत कोरोना बाधितांच्या संख्येत १ हजाराने घट झाली आहे. कालच्या दिवसात ४२ हजार ७६६ नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. एका दिवसात १२०६ कोरोनाग्रस्तांना प्राण गमवावे लागले आहेत. कोरोनाबळींचा आकडा पुन्हा वाढल्याने काहीशी चिंता व्यक्त होत आहे, तर नव्या कोरोनाग्रस्त रुग्णसंख्येत घट झाल्याने आणि कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्याही वाढत असल्याने दिलासा मानला जात आहे.

आतापर्यंतची आकडेवारी-

भारतातील एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा आता ३ कोटी ७ लाख ९५ हजार ७१६ वर गेला आहे. देशात आतापर्यंत २ कोटी ९९ लाख ३३ हजार ५३८ रुग्ण बरे झाले आहेत. तर ४ लाख ७ हजार १४५ रुग्णांनी आतापर्यंत कोरोनामुळे प्राण गमावले आहेत. ४ लाख ५५ हजार ३३ इतके सध्याच्या घडीला सक्रिय रुग्ण आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

एल्गार प्रकरणातील बनावट कागदपत्रे शरद पवारांनी सार्वजनिक करावीत – प्रकाश आंबेडकर 

News Desk

जवळपास १० महिन्यांंनंतर शाळेची घंटा वाजली, ५वी-८वीच्या विद्यार्थ्यांचे वर्ग भरण्यास आजपासून सुरुवात

News Desk

“मी राज्यपालांचा लाडका मंत्री”, महाविकासआघाडी सरकारमधील ‘या’ नेत्याचे मोठे वक्तव्य

News Desk