HW News Marathi
महाराष्ट्र

“राणेंना सूक्ष्म उद्योग मंत्री करा किंवा थेट पंतप्रधान करा; शिवसेनेला काही दुःख नाही”

सिंधुदुर्ग। केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात नारायण राणे यांनी नुकतीच सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रिपदाची शपथ घेतली आणि पदभार स्वीकारल्यानंतर आपल्याला सर्वांनी शुभेच्छा दिल्या, मात्र महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी शुभेच्छा दिल्या नाहीत, असा प्रश्न विचारल्यावर ते एवढ्या मोठ्या मनाचे नाहीत, अशी टीका नारायण राणेंनी केली होती. त्या टीकेला विनायक राऊत यांनी प्रत्युत्तर दिलं नारायण राणे यांना सूक्ष्म उद्योग मंत्री करा, अतिवरिष्ठ मंत्री करा किंवा थेट पंतप्रधान करा, शिवसेनेला दुःख वाटण्याचं कारण नाही, अशा शब्दात शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या टीकेला उत्तर दिलं. भारतीय जनता पार्टीला राणेंना मंत्रिपद द्यायचं होतं, ते त्यांनी दिलं, आता तिथे सुखाने रहा. त्या खुर्चीवर बसून पूर्वीच्या स्वभावाप्रमाणे अजून कोणाला दुखवू नका, असा टोलाही विनायक राऊतांनी लगावला.

विनायक राऊत काय म्हणाले ?

“नारायण राणे यांचा शिवसेनेकडे आणि खास करुन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे बघण्याचा जो दृष्टीकोन आहे, तो आजही बदललेला नाही, याच गोष्टीचं दुःख वाटतं” अशी खंत खासदार विनायक राऊत यांनी व्यक्त केली. “राणेंना सूक्ष्म उद्योग मंत्री करा, अतिवरिष्ठ मंत्री करा किंवा थेट पंतप्रधान करा, शिवसेनेला दुःख वाटण्याचं कारण नाही. भाजपला राणेंना मंत्रिपद द्यायचं होतं, ते त्यांनी दिलं, आता तिथे सुखाने रहा. त्या खुर्चीवर बसून पूर्वीच्या स्वभावाप्रमाणे अजून कोणाला दुखवू नका” असा टोला राऊतांनी लगावला.

काय म्हणाले होते राणे-

पदभार स्वीकारताना राणेंंनी नोंदबुकमध्ये ‘ओम श्रीगणेशा’ लिहित आपल्या नव्या इनिंगला सुरुवात केली. त्याचबरोबर त्यांनी सेनेविरोधातही श्रीगणेशा केला. पदभार स्वीकारलेल्या खुर्चीवरुनच त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर पहिला वार केला. ‘मला सगळ्यांनी शुभेच्छा दिल्या पण उद्धव ठाकरेंनी शुभेच्छा दिल्या नाहीत. कारण महाराष्ट्राचा मुख्यमंत्री एवढ्या मोठ्या मनाचा नाही’, असं म्हणत राणेंनी मंत्री झाल्यावर पहिल्यांदाच उद्धव यांच्यावर निशाणा साधला होता.

राणेंच्या कार्यशैलीची पहिल्याच दिवशी चर्चा-

आपण मंत्रालयात पदभार स्वीकारण्यासाठी येणार असल्याचं माहिती होतं. असं असताना तयारी कशी केली गेली नाही? असा सवाल राणेंनी विचारला. त्याचबरोबर यापुढे प्रत्येक बैठकीला येताना नोट सोबत आणण्याची तंबीही राणेंनी अधिकाऱ्यांना दिली. राणे यांची ही कार्यशैली पाहून दिल्लीतील अधिकारी चांगलेच भांबावल्याचं पाहायला मिळालं. राणेंच्या या बैठकीची चर्चा अन्य विभागातील अधिकारी वर्गही करत असल्याचं आज दिसून आलं.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

फडणवीसांना अटक करा, रूपाली चाकणकरांची गृहमंत्र्यांकडे मागणी

News Desk

मुंबई वीजपुरवठा खंडित प्रकरण | चौकशीसाठी समिती गठीत, ७ दिवसांत अहवाल देण्याचे निर्देश

News Desk

समाजकार्य महाविद्यालयातील शिक्षक व समकक्ष पदांना सातवा वेतन आयोग लागू करण्याचा निर्णय – धनंजय मुंडे

News Desk