HW News Marathi
महाराष्ट्र

‘संजय राठोड लवकरच मंत्रिमंडळात येतील, शिवसेनेच्या मंत्र्याचं मोठ विधान!

मुंबई। पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणामुळे शिवसेनेचे नेते आणि माजी वनमंत्री संजय राठोड यांना आपल्या वन मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. पण, त्यांची कामाची पद्धत पाहता त्यांच्यासारख्या नेत्याची गरज आहे, लवकरच ते मंत्रिमंडळात सामील होतील, असं सूचक विधान शिवसेनेचे नेते आणि राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केलं आहे. उदय सामंत शुक्रवारी यवतमाळ जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. शासकीय तंत्रनिकेतन येथील कॉन्फरन्स हॉलमध्ये शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, शासकीय तंत्रनिकेतन, शासकीय अध्यापक महाविद्यालय इत्यादी संस्थांचा आढावा घेतला. त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधला.

संजय राठोड हे मंत्रिपदावरून पायउतार झाले आहे. बंजारा समाजाचे ते मोठे नेते आहे. त्यांची कार्यशैली ही उत्तम आणि धडाडीची होती. त्यामुळे अशा नेत्यांची शिवसेनेला गरज आहे. या प्रकरणातून त्यांची सुटका झाल्यास लवकरच ते मंत्रिमंडळात येतील, असंही उदय सामंत म्हणाले, असं वृत्त दैनिक महाराष्ट्र टाइम्सने दिलं आहे.

संजय राठोड हे मंत्रिपदावरून पायउतार झाले आहे. बंजारा समाजाचे ते मोठे नेते आहे. त्यांची कार्यशैली ही उत्तम आणि धडाडीची होती. त्यामुळे अशा नेत्यांची शिवसेनेला गरज आहे. या प्रकरणातून त्यांची सुटका झाल्यास लवकरच ते मंत्रिमंडळात येतील, असंही उदय सामंत म्हणाले, असं दैनिक महाराष्ट्र टाइम्सने आपल्या वृत्तात दिलं होत.

केंद्रीय मंत्रीमंडळावर सामंत म्हणाले-

भाजपच्या जुन्या लोकांना डावलण्यात आलं केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारावर बोलताना उदय सामंत यांनी पंकजा मुंडे आणि इतर जुन्या लोकांना डावलण्यात आलं आहे हे केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारातुन लक्षात आले आहे, असं उदय सांमंत म्हणाले. सोबतच नारायण राणे यांच्यामुळे कोकणच्या शिवसेनेनला कोणताही नुकसान होणार नाही. कोकणातील शिवसेना ही शिवसैनिकांची आहे , बाळासाहेबांवर प्रेम करणारी आहे आणि उद्धव ठाकरे यांच नेतृत्व मानणारी आहे. महाराष्ट्रात कोणी कितीही मंत्री केले तर शिववसेनेला शह देऊ शकतात हे फार मोठं आणि दिवसा बघितलेले स्वप्न आहे. शिवसेना आहे त्यापेक्षा जोरदारपणे या दोन वर्षात झेपावलेली आपल्याला महाराष्ट्रात दिसेल असंही ते म्हणाले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

विद्यार्थ्यांच्या सहनशीलतेचा अंत न पाहता ‘परीक्षा’ या विषयाचा एकदाचा ‘निकाल’ लावावा – रोहित पवार

News Desk

परदेश शिष्यवृत्तीसाठी धनंजय मुंडे यांनी दिली ही महत्त्वाची माहिती

News Desk

आयुक्त, मुख्याधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी जाऊन पाहणी करा; एकनाथ शिंदेंनी पावसाळापूर्व कामांचा घेतला आढावा

Aprna