HW News Marathi
महाराष्ट्र

जरंडेश्वर प्रकरणी सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेला ईडीची नोटीस..!

सातारा। राज्याच्या राजकारणात अनेक घडामोडी घडतांना दिसतात, आणि याच पार्श्वभूमीवर अनेक राजकारणी मंडळींच्या मागे ईडीचा ससेमिरा लागल्या नंतर सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेला ईडीची नोटीस आता आलेली आहे. जरंडेश्वर प्रकरणी ईडी अ‍ॅक्शन मोडवर आता आली आहे. साताऱ्याच्या कोरेगाव तालुक्यातील चिमणगावमधल्या चर्चित जरंडेश्वर कारखान्याच्या कर्ज प्रकरणाची चौकशी करण्यासाठी ईडीने सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेला नोटीस पाठवलेली आहे.

जरंडेश्वर वर ईडीची कारवाई- 

आघाडी सरकारच्या काळात अजित पवार शिखर बँकेचे अर्थात महाराष्ट्र राज्य सहकारी को ऑप बँकेचे अध्यक्ष होते. त्या काळात या बँकेत कथित २५ हजार कोटीचा घोटाळा झाल्याचा आरोप आहे. तर जरंडेश्वर कारखाना कवडीमोल भावाने विकल्याचा आरोप आहे, तो कारखाना सुद्धा अजित पवारांच्या नातेवाईकाचा आहे. राजेंद्र घाडगे हे अजित पवारांचे मामा या बँकेचे चेअरमन आहेत. यांच्याच कार्यकाळात ईडीने या कारखान्यावर जप्तीची कारवाई केली.

महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेत सुमारे २५ हजार कोटी रुपयांचा घोटाळा झाला होता. याबाबत मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने २२ ऑगस्ट २०१९ रोजी हा गुन्हा दाखल केला होता. याच गुन्ह्याच्या आधारावर ईडीने आपला गुन्हा दाखल केला करून तपास सुरू केला होता. बेहिशेबी मालमत्ता प्रकरणात ही कारवाई करण्यात आली आहे. अशी या कारवाई मागचं ढोबळ कारण आहे.

काय आहे प्रकरण?

जरेंडेश्वर सहकारी साखर कारखाना हा सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील चिमणगाव येथे आहे. सध्याच्या मालकांनी हा कारखाना २०१० सालात ६५ कोटी ७५ लाख रुपयांना खरेदी केला होता.हा कारखाना सध्या मेसर्स गुरू कमोडिटी सर्विसेस प्रा. ली यांच्या मालकीचा आहे.हा कारखाना मेसर्स जरेंडेश्वर शुगर मिल प्रा लिमिटेडला भाड्याने देण्यात आला आहे. मेसर्स जरडेश्वर प्रा लिमिटेड कंपनीत मेसर्स सपार्किंग सोईल प्रा लिमिटेड कंपनी ही भागीदार कंपनी आहे. ईडीने केलेल्या तपासात मेसर्स स्पार्कलिंग कंपनी ही उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांची पत्नी सुनेत्रा पवार यांच्याशी संबंधित आहे.

तपासात जरांडेश्वर सहकारी साखर कारखान्याची २०१० सालात विक्री करण्यात आली होती. वेळी तो मूळ किमतीच्या कमी किंमतीत विकण्यात आला होता. त्याचप्रमाणे त्याची योग्य कार्यपद्धतीने पाळण्यात आली नव्हती.याच काळात अजित पवार हे महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या संचालक मंडळावर होते.याच काळात हा कारखाना मेसर्स गुरू कमोडिटी सर्विसेस प्रा.लिमिटेडला विकण्यात आला. नंतर तात्काळ हा कारखाना जरंडेश्वर शुगर मिल प्रा ली ला भाडे तत्वावर देण्यात आला. जरंडेश्वर शुगर मिल्स प्रा ली मध्ये मोठ्या प्रमाणात स्पार्कलिंग सोईल प्रा ली. कंपनीचा हिस्सा आहे.

ही कंपनी अजित पवार आणि सुनेत्रा पवार यांच्या मालकीची आहे. जरंडेश्वर सहकारी साखर कारखाना हा प्रथम मेसर्स गुरू कमोडीटी प्रा ली कंपनीने विकत घेतला होता.मात्र, ही गुरू कमोडिटी कंपनी बनावट असल्याचा ईडीच्या अधिकाऱ्यांना संशय आहे.जरंडेश्वर शुगर मिल प्रा ली ने पुणे जिल्हा कॉ ऑप बँकेकडून सुमारे ७००कोटी रुपये कर्ज घेतलं आहे. हे कर्ज २०१० पासून पुढील काळात घेतलं आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘जॉन्सन अँड जॉन्सन लशीला भारतात मान्यता’, 2 नाही तर घ्यावा लागणार कोरोना लशीचा एकच डोस!

News Desk

मोदी सरकराच्या इमेज बिल्डिंगवर अनुपम खेर यांचा थेट प्रहार! प्रतिमेपेक्षा लोकांचा जीव वाचवा…

News Desk

जरंडेश्वर साखर कारखाना जप्ती, अजित पवारांनी खोडून काढले सर्व आरोप

News Desk