HW News Marathi
महाराष्ट्र

शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड अपघातातून थोडक्यात बचावले!

हिंगोली। महाराष्ट्र राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्या गाडीचा अपघात झाला असल्याचं समोर आलं आहे. वर्षा गायकवाड या अपघातातून थोडक्यात बचावल्या आहेत. त्या (१०जुलै) आज सकाळी वर्षा गायकवाड यांच्या कारला भरधाव टेम्पोनं मागच्या बाजून धडक दिली. या अपघातात कोणीही जखमी झालेलं नाही, अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे. शिक्षणमंत्री दोन दिवसांपासून हिंगोलीच्या दौऱ्यावर आहेत. त्या हिंगोलीच्या पालकमंत्री आहेत.

वर्षा गायकवाड दोन दिवसांच्या दौऱ्यावर –

वर्षा गायकवाड या महाराष्ट्राच्या शालेय शिक्षणमंत्री असून हिंगोलीच्या पालकमंत्री देखील आहेत. हिंगोलीतील कामाचा आढावा घेण्यासाठी त्या कालपासून हिंगोली दौऱ्यावर आहेत. हिंगोलीतील नियोजित कार्यक्रमानुसार रामलीला मैदानापर्यंत जाण्यासाठी निघाल्या असताना वर्षा गायकवाड यांच्या गाडीला अपघात झाला.

अपघात कसा घडला?

वर्षा गायकवाड अपघातातून थोडक्यात बचावल्या आहेत. हिंगोली दौऱ्यावर असताना कारला टेम्पोनं मागच्या बाजूनं धडक दिली. या अपघातात कोणीही जखमी झालेली नाही. वर्षा गायकवाड हिंगोलीतील ऑक्सिजन प्रकल्पाचं उद्घाटन करुन रामलीला मैदानाची पाहणी करण्यासाठी निघाल्या होत्या. यावेळी मागून आलेल्या भरधाव महिंद्रा पीकअपनं वर्षा गायकवाड यांच्या कारला मागच्या बाजून धडक दिली. यामध्ये कारचं मागच्या बाजूनं नुकसान झालं आहे. मात्र, यामध्ये कोणीही जखमी झालेलं नाही.

कोरोना काळात कोणत्याही प्रकारची शुल्कवाढ करू नये, असे स्पष्ट आदेश असताना देखील मुंबई, नवी मुंबईतील शाळांनी फी वाढ करणे, पालकांकडे फी भरण्यासाठी तगादा लावणे, विद्यार्थ्यांचे निकाल रोखणे यासह शिक्षण अधिकार अधिनियमांचे उल्लंघन करणाऱ्या ८ शाळांवर अखेर शिक्षण विभागाने कारवाईचा बडगा उगारला आहे. या शाळांचे ना हरकत प्रमाणपत्र रद्द करण्याचा प्रस्ताव शिक्षण संचालकांकडे सादर करण्यात आला असून लवकरच याबाबत अंतिम निर्णय जाहीर केला जाणार आहे. शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी हिंगोली मध्ये पत्रकारांशी बोलताना दिली होती.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कुक्कुटपालन करणाऱ्यांना आर्थिक सहाय्य देण्याची फडणवीसांची मागणी  

News Desk

बिहार विधानसभा निवडणुकीआधी शरद पवार आणि संजय राऊतांची यासाठी भेट

News Desk

एसटी महामंडळाच्या तिकीटात १५ जूनपासून १८ टक्के वाढ

swarit