मुंबई। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हेच महाविकास आघाडी सरकारचे रिमोट कंट्रोल आहेत असं वक्तव्य काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलं आहे. एवढंच नाही तर आम्ही कोणत्याही मोठ्या नेत्याविरोधात भाष्य करत नाही पण आमच्याबाबत विधान करण्यापूर्वी कोणत्याही व्यक्तीने आपल्या पक्षाकडेही पाहण्याची गरज आहे असंही नाना पटोले यांनी स्पष्ट केलं आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या या विधानामुळे पुन्हा एकदा राजकीय वातावरण तापले आणि अनेक चर्चांना आता ऊत आला आहे, गेल्या काही दिवसांपासून नाना पटोले हे त्यांच्या वेगवेगळ्या विधानांमुळे राजकारणात चर्चेत असतात.
तर शरद पवार यांनीही नाना पटोलेंच्या स्वबळाच्या मुद्द्यावर भाष्य करत मी लहान माणसांबद्दल बोलत नाही असं म्हटलं होतं. तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एका कार्यक्रमात आम्ही स्वबळावर तुमच्याकडे जेवायला येऊ असा टोला लावला होता.त्यानंतर नाना पटोले यांचं आणखी एक विधान समोर आलं. त्यांचा एक व्हीडिओ व्हायरल झाला होता. ज्या व्हीडिओत नाना पटोले यांनी अशा आशयाचं वक्तव्य केलं होतं की मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हे माझ्यावर पाळत ठेवून आहेत. मात्र त्यानंतर जेव्हा वाद निर्माण झाला तेव्हा माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला मी पंतप्रधान आणि केंद्रीय गृहमंत्र्याबाबत बोललो होतो अशी सारवासारव नाना पटोले यांनी केली. त्यानंतर आता पुन्हा एकदा त्यांचं वक्तव्य समोर आलं आहे. शरद पवार हेच महाविकास आघाडी सरकारचे रिमोट कंट्रोल आहेत अस वक्तव्य आता नाना पटोले यांनी केलं आहे
There is no doubt that Sharad Pawar is remote control (of Maharashtra govt). We (Congress) do not make statements against any big leader, but any outsider should look into own party before making statements: Maharashtra Congress leader Nana Patole pic.twitter.com/uj7J7xbLg4
— ANI (@ANI) July 15, 2021
गेल्या काही दिवसांपूर्वीच त्यांनी स्वबळावर लढण्याची भाषा केली होती. तर २०२४ मध्ये काँग्रेस पक्ष स्वबळावर आपली सत्ता महाराष्ट्रात आणेल असं नाना पटोलेंनी म्हटलं होतं. त्यामुळे महाविकास आघाडीत सारं काही आलबेल नाही अशा चर्चाही सुरू झाल्या होत्या. मात्र शिवसेना खासदार संजय राऊत यांनी याबाबत आता प्रतिक्रिया दिली आहे. संजय राऊत म्हणाले होते की प्रत्येकाला आपला पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे. त्यामुळे नाना पटोले जे म्हणाले त्यात चुकीचं काही नाही. त्यांच्या वक्तव्यामुळे महाविकास आघाडी सरकारला काही धोका आहे असं मुळीच नाही. महाविकास आघाडी सरकार हे आपला कार्यकाळ पूर्ण करणार आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.