HW News Marathi
महाराष्ट्र

‘वसुली सरकारचा रिमोट कंट्रोल मातोश्रीवर नाही तर,’ सिल्व्हर ओकवर भाजपचा आरोप!

मुंबई। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटलंय महाविकास आघाडीचे रिमोट कंट्रोल शरद पवार आहेत. पटोले यांचे वक्तव्य १०० टक्के सत्य असल्याचे भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी म्हटलं आहे. महाविकास आघाडी सरकारचा रिमोट कंट्रोल मातोश्री नव्हे तर सिल्व्हर ओक असल्याचा खोचक टोला अतुल भातखळकर यांनी लगावला आहे. भाजप नेते अतुल भातखळकर हे सत्ताधाऱ्यांच्या कारभारावर टीका करत असतात. राज्यात सुरु असलेल्या वसुलीचा रिमोट शरद पवार आहेत असं नाना पटोले यांना सुचवायचे आहे का? असा सवालही अतुल भातखळकर यांनी केला आहे.

भाजप नेते अतुल भातखळकर यांनी ट्विट करत पुन्हा एकदा महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे. भातखळकर यांनी म्हटलं आहे की, नाना पटोले म्हणतायत महाविकास आघाडी सरकारचे रिमोट कंट्रोल शरद पवार आहेत. त्यांचे म्हणणे शंभर टक्के सत्य आहे. केवळ सरकारचाच नाही तर राज्यात सुरु असलेल्या वसुलीचा रिमोटही तेच आहेत. असे नाना पटोले यांना सुचवायचे आहे का? असा सवाल भातखळकर यांनी केला आहे. दरम्यान पुढे भातखळकर यांनी म्हटलं आहे की, प्रॉब्लेम फक्त एवढा आहे, की टीव्ही घरात(कडी) बंद असल्यामुळे रिमोट अगदीच निरुपयोगी झालाय असा खोचक टोला अतुल भातखळकर यांनी लगावला आहे.

नाना पटोले काय म्हणाले होते?

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी महाविकास आघाडी सरकारचे रिमोट कंट्रोल शरद पवार असल्याचे म्हटलं आहे. शरद पवार आमच्यासाठी आदरणीय आहेत. पक्षश्रेष्ठींनी राज्यातील काँग्रेस पक्षाला मजबूत करण्याची जबाबदारी दिली असून ती मी पार पाडणार आहे. राष्ट्रवादी किंवा शिवसेनेवर मी हल्ला करत नाही आहे. आमचा भाजपला विरोध असल्याचे वक्तव्य नाना पटोले यांनी म्हटलं आहे. शरद पवार यांना नाना पटोलेंच्या भूमिकेबाबत प्रश्न विचारला असता छोट्या माणसांबद्दल बोलणार नाही असं वक्तव्य पवार यांनी केल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

गोदापार्कचा पॅटर्न पुण्यात राबवण्याचा राज यांचा मनोदय

News Desk

भारतीय क्रिकेट टीमचे विमान मुंबईत लॅंड करण्यामागे शरद पवार!

News Desk

स्वातंत्र्यवीर सावरकरांचा जन्मदिवस ‘स्वातंत्र्यवीर गौरव दिन’ म्हणून साजरा करणार; मुख्यमंत्र्यांची घोषणा

Aprna