HW News Marathi
महाराष्ट्र

शरद पवारांना राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत बळीचा बकरा करू नका – आठवले

पुणे। राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना राष्ट्रपतीपदाचे उमेदवार करण्याच्या हालचाली विरोधी पक्षांकडून सुरू आहेत. त्यावर केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आज आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. विरोधक शरद पवारांना राष्ट्रपतीपदाचे उमेदवार म्हणून पुढे करत आहेत. पवार लढायला तयार असतील तर आमच्या त्यांना शुभेच्छा आहेत, असं सांगतानाच पवार या निवडणुकीत विरोधकांच्या ताकदीवर निवडून येणार नाहीत. त्यामुळे त्यांचा विरोधकांनी बळीचा बकरा करू नये, असं आवाहन रामदास आठवले म्हणाले.

रामदास आठवले आज पुण्यात पत्रकारांशी संवाद साधत होते. त्यावेळी त्यांनी हे आवाहन केलं. याप्रसंगी महापौर मुरलीधर मोहोळ, उपमहापौर सुनीता वाडेकर, परशुराम वाडेकर, सभागृह नेते गणेश बिडकर, नगरसेवक डॉ. सिद्धार्थ धेंडे, अॅड. आयुब शेख, हिमाली कांबळे, शशिकला वाघमारे, असीत गांगुर्डे, संजय सोनवणे आदी उपस्थित होते.यावेळी त्यांनी शरद पवार हे देशाचे नेते आहेत. ते धोकेबाज नेते नाहीत, असंही स्पष्ट केलं. पुणे महापालिकेची आगामी निवडणुक आम्ही भाजपसोबतच लढणार आहोत. पुन्हा आमचीच सत्ता येईल असे भाकीत करतानाच शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी वेगवेगळे लढले‌ तर आम्ही त्यांच्यावर मात करू, असा आत्मविश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आता कोर्टाने विचारल्यानंतर त्यावर निर्णय राज्यपाल घेतील, राष्ट्रवादीचा उपरोधिक टोला

News Desk

‘नारायण राणेंची जन आशीर्वाद यात्रा ठरली!’

News Desk

सोनिया गांधींपुढे गुडघे टेकून शिवसेनेने महाराष्ट्राचा स्वाभिमान गहाण टाकला’ – केशव उपाध्ये

News Desk