HW News Marathi
महाराष्ट्र

भाजपच्या माजी मंत्र्यांना मोठा धक्का, चुलत भावाचा अजित पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश!

पुणे। भारतीय जनता पार्टीचे आणि माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांचे चुलत भाऊ व माजी सभापती प्रशांत पाटील यांनी आज (१६ जुलै) राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. पुण्यातील या पक्षप्रवेश कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री अजित पवार, राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, जिल्हा अध्यक्ष प्रदीप ग़ारटकर यांची प्रमुख उपस्थिती होती. पुणे येथील शासकीय विश्रामगृह या ठिकाणी हा पक्ष प्रवेश झाला. प्रशांत पाटील हे इंदापूर पंचायत समितीचे माजी सभापती होते आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

या पक्ष प्रवेशानंतर प्रशांत पवार म्हणाले, “राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे व राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे यांच्या मार्गदर्शनाखाली इंदापूर तालुक्यात जोरदार काम करणार आहे. भाजपचे असंख्य कार्यकर्ते राष्ट्रवादीत आणणार आहे.” आगामी काळात नगर पालिका, जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका होणार आहेत. तसेच सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुका देखील होणार आहेत. प्रशांत पाटील यांच्या माध्यमातून या येणाऱ्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला फायदा होऊ शकतो.

पवारांची बैठक-

विधानभवनाच्या सभागृहात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली जिल्ह्यातील करोना परिस्थिती व उपाययोजनांबाबत आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी उपमुख्यमंत्री बोलत होते. अजित पवार म्हणाले की, करोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता लक्षात घेऊन आरोग्य सोयीसुविधा वाढविण्यात येत असून सरकार नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेत आहे. नागरिकांनीही आपली जबाबदारी ओळखून निर्बंधाचे काटेकोरपणे पालन करावे. जिल्ह्यात सध्या करोना रुग्ण वाढीचा दर स्थिर असला तरी या आठवड्यातील निर्बंध पुढील आठवड्यातही कायम राहतील. ज्या नागरिकांनी लसचे दोन्ही डोस घेतले आहेत त्यांनीही नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाचे निर्णय राज्य सरकार घेत असल्याचे सांगून उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, ‘नियमांचे पालन करून काही उद्योगधंदे सुरू आहेत. उद्योगपतींनीही त्यांच्या कामगारांच्या लसीकरणाची जबाबदारी घेतली आहे. जिल्ह्यात लसीकरणाचे प्रमाण वाढत असून आवश्यक तेवढा लस पुरवठा होत नाही.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

जेव्हा राज ठाकरेंचे सरकार येईल तेव्हा…संदीप देशपांडेंचा इशारा

News Desk

एकटा संभाजी काय करेल, वडील शाहू महाराज पुत्राच्या मागे ठाम उभे!

News Desk

आरक्षणासाठी धनगर समाजही रस्त्यावर उतरणार 

swarit