HW News Marathi
Covid-19

कोरोनातून बरे झालेल्यांना आता TB संक्रमणाचा धोका..!

मुंबई | गेल्या दिड वर्षांपासून संपूर्ण जग कोरोना महामारीच्या विळख्यातून सुटण्याचा प्रयत्न करतंय. यात काही देशांना यश देखील आलेलं आपल्याला पाहायला मिळाले. मात्र या संपूर्ण प्रक्रियेत इतर अनेक गंभीर आजारांचा धोका अधिक असण्याची दाट शक्यता प्रशासन यंत्रणेकडून वेळोवेळी दर्शवण्यात अली होती. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, कोरोनाबाधित व्यक्तीला टीबीचा धोका अधिक वाढतो. आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार २०२० मध्ये कोरोनाविरोधातील प्रतिबंधांमुळे टीबीच्या प्रकरणांमध्ये जवळपास २५ टक्क्यांनी घट झाली होती. मात्र, आता समोर येत असलेल्या काही बातम्यांनी चिंता वाढवली आहे.

जगभरात कोरोनानं अक्षरशः थैमान घातलेलं आहे. अशातच आता कोरोनामुळे इतरही गंभीर आजार होण्याचा धोका वाढला आहे. आरोग्य मंत्रालयाने सांगितल्याप्रमाणे कोरोनाची लागण झालेल्या लोकांमध्ये टीबीची प्रकरणं अचानक वाढत असल्याचं नुकतंच समोर आलं आहे. दररोज अनेक नवीन प्रकरणं समोर येत असल्यानं डॉक्टरही चिंतेत आहेत. आता आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयानं सर्व कोरोना रुग्णांना टीबी टेस्ट आणि टीबी रुग्णांना कोरोना चाचणी करण्याचा सल्ला दिला आहे. यामुळे कोरोनातून दिलासा तर नाहीच मात्र अडचणीत आणखीच वाढ झाल्याचं चित्र आहे.

कोरोनामधून बरे झालेल्या रुग्णांना सतर्क राहून आरोग्याची काळजी गरज यातून निर्माण झाली आहे. बरं झालेल्यांना असलेला टीबीचा धोका लक्षात घेता आरोग्य मंत्रालयानं असं म्हटलं आहे, की SARS-COV-2 संक्रमण एखाद्या व्यक्तीसाठी टीबीचा धोका वाढवू शकतं. मात्र, कोरोनामुळे टीबीच्या प्रकरणांमध्ये वाढ होत असल्याचे अद्याप ठोस आणि पुरेसे पुरावे मिळालेले नाहीत. मात्र, संभाव्य धोका लक्षात घेता कोरोनातून बरं झालेल्यांनी टीबीची चाचणी करून घेणं गरजेचं आहे, असं आरोग्य मंत्रालयाचं म्हणणं आहे.

त्याचप्रमाणे आता लवकरात लवकर लसीकरण होणं गरजेचं असल्याचं नागरिकांना जाणवू लागलं आहे. आरोग्याच्या दृष्टीने सावधानतेची पाऊलं घेण्यासाठी प्रशासन वेळोवेळी नागरिकांना सुचना करतच असतं मात्र आता ‘टि.बी’चा नव्याने समोर आलेला धोका लक्षात घेता नागरिकांनी जास्त सतर्क राहणे गरजेचे आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुख्यमंत्र्यांच्या रक्षणासाठी असलेल्या महिला पोलिस अधिकारी कोरोना पॉझिटिव्ह

News Desk

राज्य सरकारचा महत्वपूर्ण निर्णय, बंधपत्रित डॉक्टर्सच्या मानधनात मोठी वाढ

News Desk

आता सांगलीत कोरोना पाय पसरवणार नाही , जयंत पाटलांना विश्वास !

Arati More