HW News Marathi
महाराष्ट्र

महापौर किशोरी पेडणेकर यांची प्रकृती उत्तम, हॉस्पिटलमधून डिस्चार्ज!

मुंबई। मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांची प्रकृती उत्तम असून त्या आज (२०जुलै) परळ येथील ग्लोबल रुग्णालयामधून सुखरूप घरी परतल्या आहेत. ग्लोबल रुग्णालयाच्या वतीने महापौर किशोरी पेडणेकरांना देण्यात आलेल्या निरोपाला उत्तर देताना महापौर म्हणाल्या की, ग्लोबल रुग्णालय आपल्या नावाप्रमाणे येथे आलेल्या प्रत्येक रुग्णांची या आरोग्य मंदिरात चांगली सेवा करीत असून मी सर्व रुग्णालय कर्मचाऱ्यांचे आभार मानते अस महापौर म्हणाल्या.

(१८ जुलै) सकाळी किशोरी पेडणेकर यांची प्रकृती अचानक बिघडली होती. छातीत दुखू लागल्याने त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. परंतु दोन दिवसांच्या उपचारांनंतर आता त्यांची प्रकृती बरी असून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.किशोरी पेडणेकर यांना शनिवारी रात्रीपासूनच त्रास होत होता. छातीत दुखू लागल्याची तक्रार त्यांनी केली होती. मात्र, हा त्रास अधिक वाढल्याने रविवारी सकाळी त्यांना ग्लोबल रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यांना रुग्णालयात दाखल करताच तातडीने विविध चाचण्या करण्यात आल्या. दोन दिवस उपचार घेतल्यानंतर आज त्या घरी परतल्या आहेत.

स्थानिक आमदार अजय चौधरी, माजी आमदार दगडू सपकाळ, सुधीर साळवी यांचे विशेष सहकार्य लाभले असून याबद्दल महापौरांनी त्यांचेदेखील आभार मानले आहेत. त्यासोबतच रुग्णालयाचे कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. विवेक तळवलीकर, वरिष्ठ हृदयरोग तज्ज्ञ डॉ. प्रवीण कुलकर्णी, अस्थिरोग तज्ज्ञ डॉ. श्रीधर आर्चिक, पोटविकार तज्ज्ञ डॉ. अमित मायदेव, यकृत तज्ज्ञ डॉ. आकाश शुक्ला, ग्लोबल रुग्णालयाचे परिचालन प्रमुख अनुप लॉरेंस, परिचारिका विभागाच्या प्रमुख जेसिका डिसूझा या सर्वांचे सुद्धा महापौरांनी आभार मानले आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

प्रीतम मुंडेंना मंत्रिमंडळातून डावल्यामुळे मुंडे गटात नाराजी? भावनिक पोस्ट झाली व्हायरल

News Desk

‘जनाची नाही, तरी मनाची ठेवावी’, रोहित पवारांचा भाजपला टोला

News Desk

मुख्यमंत्र्यांनी घरातून बाहेर पडण्याचा सल्ला देणाऱ्या मनसैनिकाला दादा भूसेंचे प्रत्युत्तर

News Desk