HW News Marathi
महाराष्ट्र

‘उल्हासनगर स्थानकाजवळ अल्पवयीन मुलीवर बलात्कार!’

कल्याण। मुंबईत काल(११ सप्टेंबर) भयंकर घटना घडली. साकीनाका परिसरात एका महिलेवर बलात्कार करून तिच्या गुप्तांगात रॉड घुसवून तिला मारण्यात आले आहे. या घटनेला २४ तास होत नाहीत, तोवर दुसरी बलात्काराची भयानक गोष्ट समोर आली आहे. उल्हासनगर स्थानक परिसरात एका १४ वर्षीय तरुणीवर बलात्कार करण्यात आला आहे. हातोडीचा धाक दाखवून त्या तरुणीवर बलात्कार करण्यात आला आहे.

नेमकं काय घडलं?

पीडित अल्पवयीन मुलगी उल्हासनगर परिसरात आपल्या आजीसोबत राहते. ती आपल्या आईला भेटण्यासाठी शिर्डीला गेली होती. शिर्डीवरून शुक्रवारी रात्री (१० सप्टेंबर) ९ वाजण्याच्या सुमारास बसने ती कल्याणपर्यंत आली. कल्याणमध्ये लोकल पकडून ती उल्हासनगर स्थानकात पोचली. उल्हासनगर स्थानकात उतरल्यानंतर स्कायवॉकवर तिला काही मित्र भेटले. त्यामुळे ती त्यांच्यासमवेत बोलत उभी होती. याचवेळी आरोपी श्रीकांत गायकवाड हा माथेफिरू तरुण तिथे आला. त्याने हातातील हातोडीने तिच्या मित्रांना धाक दाखवत पळवून लावले.

त्यानंतर या मुलीला धाक दाखवत जबरदस्तीने स्थानकाच्या बाजूला असलेल्या पडक्या वसाहतीच्या जवळ नेले. पीडित अल्पवयीन तरुणीने त्याला विरोध केल्याने तिला मारहाण करीत तिच्यावर अमानुष बलात्कार केला. यानंतर आरोपी पळून गेला. श्रीकांत गायकवाड अस आरोपीचे नाव असून त्याच्यावर पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. रेल्वे स्थानक परिसरात घडलेल्या या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.

घटनेनंतर मुलगी नातेवाईकाला सोबत उल्हासनगरमधील हिल लाईन पोलीस ठाण्यात गेली. हद्दीचा विषय असल्यानं तिला कल्याण रेल्वे पोलीस ठाण्यात पाठवण्यात आलं. त्यानंतर याप्रकरणी कल्याण रेल्वे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात असून पोलिसांनी श्रीकांत गायकवाड या नराधामला अटक केली.

दरम्यान, आरोपीनं मुलीला मारहाण केल्यानं जखमा झाल्या आहेत. तिच्या डोक्यालाही मार लागलेला असून, तिच्यावर रुग्णालयात उपचार करण्यात आले. पोलीस पुढील तपास करत आहेत. नराधम गायकवाड यावर आधीही सात ते आठ गुन्हे दाखल आहेत. अशी माहिती रेल्वे पोलीस वाल्मिक शार्दूल यांनी दिली आहे.

साकीनाका बलात्कार प्रकरण

मुंबईला हादरवून सोडणारी घटना काल (११ सप्टेंबर) साकीनाक्या परिसरात घडली आहे. एका ३६ वर्षीय महिलेवर एका इसमाने बलात्कार करून तिच्या गुप्तांगात रॉड घुसवला होता. त्या पीडितेवर घाटकोपरच्या राजावाडी रुग्णालयात उपचार चालू होते, मात्र उपचारा दरम्यान तिचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणामुळे महाराष्ट्रात खळबळ माजली आहे. अनेक राजकीय नेते संताप व्यक्त करत आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टवर चालवायचे आदेश दिले आहेत. मुंबई पोलिस आयुक्त हेमंत नगराळे यांनी या प्रकरणात अधिक माहिती दिली आहे. हेमंत नगराळे यांनी पत्रकार परिषद घेतली होती. त्यावेळी बोलताना त्यांनी ही माहिती दिली आहे.

21 सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडी

जखमी महिलेला पोलिसांनी राजावाडी रुग्णालयात दाखल केलं. त्यानंतर आरोपीविरोधात 307, 376 नुसार गुन्हा दाखल केला. या प्रकरणात मोहन या आरोपीला संशयावरुन ताब्यात घेतलं आहे. तो जोनपूरचा रहिवासी आहे. या आरोपीच्या अंगावर रक्ताचे डाग होते. न्यायालयात हजर केलं असता आरोपीला 21 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या प्रकरणाच्या तपासासाठी एसआयटी स्थापन केली आहे. पुढील एक महिन्यात हा गुन्हा उघडकीस आणू, असा दावाही मुंबई पोलिस आयुक्तांनी केला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘महाराष्ट्राचा मुख्यमंत्री एवढ्या मोठ्या मनाचा नाही’, नारायण राणेंचा टोला!

News Desk

“राणे म्हणतात, दीपक केसरकर शेंबडे आमदार”;आता केसरकरांकडून राणेंचा समाचार

News Desk

नांदेडात शेकडो क्विंटल बोगस बियाणे जप्त

Aprna