HW News Marathi
महाराष्ट्र

‘कायदेतज्ज्ञांकडून सल्ला घेतला असता तर ही वेळ आली नसती,’ रावसाहेव दानवेंचा महाविकास आघाडीला टोला!

नवी दिल्ली। मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी पुन्हा एकदा महाविकास विकास आघाडी सरकारला फटकारलं आहे. नारायण राणे समिती स्थापन केली आणि त्या आधारावर तुम्ही आरक्षण दिलं. त्या काळात केंद्र आणि राज्यातही तुमचं सरकार होतं. जर हा विषय केंद्राचा होता तर मग केंद्राला डावलून तुम्ही आरक्षण कसं दिलं? असा सवाल रावसाहेब दानवे यांनी मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांना विचारलाय. आज राजकीय परिस्थिती बदलली तर तुम्ही केंद्राकडे बोट दाखवत आहात. त्यावेळी जर तुम्ही कायदेतज्ज्ञांकडून सल्ला घेतला असता तर ही वेळ आली नसती, असा आरोपही रावसाहेब दानवे यांनी केला आहे.

मराठा समाजाला मिळालेलं आरक्षण यांनी घालवलं. ज्या गोष्टीत यांना अपयश येतं त्या गोष्टीबाबत हे केंद्राकडे बोट दाखवतात. सगळे विषय केंद्राकडे ढकलायचे, मग हे काय करतात? मुळात हे अनैसर्गिक सरकार आहे. अमर, अकबर, अॅन्थनीचं सरकार आहे. चित्रपटाच्या पोस्टरवर ज्या प्रमाणे एकाचं तोंड एकिकडे तर दुसऱ्याचं दुसरीकडे असं तसंच या सरकारचं आहे. राज्य सरकारमध्ये अंतर्गत कलह आहे, म्हणूनच हे निर्णय करु शकत नाहीत. त्याचा फटका जनतेला बसत असल्याची टीका रावसाहेब दानवे यांनी केलीय.

कोणत्याही घटकावर अन्याय केला जाणार नाही

राज्यघटनेत ज्या तरतुदी आहेत त्यास अधीन राहुनच सरकार निर्णय घेणार. कोणत्याही घटकावर अन्याय केला जाणार नाही. आम्ही ओबीसी समाजाच्या विरोधात नााही. भाजपमध्ये आधापासूनच मंडल आयोग लागू आहे. गोपीनाथ मुंडे, ना. स. फरांदे, भाऊसाहेब फुंडकर, पंकजा मुंडे हे सर्व भाजपचे ओबीसी समाजाचे नेते आहेत. ओबीसींना मुख्य पदावर प्रतिनिधीत्व देणारी ही एकमेव पार्टी आहे, असा दावाही दानवे यांनी केलाय.

अत्यंत तिखट शब्दात समाचार घेतला

शिवसेना नेत्यांचा आरक्षणावरील अभ्यास कच्चा आहे, असं रावसाहेब दानवे यांनी वक्तव्य केलं होतं. त्याचाही राऊत यांनी अत्यंत तिखट शब्दात समाचार घेतला. आम्ही त्यांची शिकवणी लावू. त्यांची शिकवणी लावून मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटणार असेल तर तेही करू. इथे माझ्यापासून दोन पावलांवरच आमचे रावसाहेब राहतात. काही हरकत नाही. त्यांचा क्लास लावून टाकू. कोचिंग करू त्यांचे. पण आरक्षण द्या. इथं विषय अभ्यासाचा नाही. भले भले अभ्यास करणारे लोकं मराठा समाजात आहेत. त्यांनी आरक्षणातील कायदेशीर किस काढला आहे, असं ते म्हणाले.

आम्हालाही शिकवता येतं

आज सकाळी अशोक चव्हाण माझ्याकडे आले होते. ते माजी मुख्यमंत्री आहेत. मराठा आरक्षण उपसमितीचे ते अध्यक्ष आहेत. त्यांनी माझ्याकडे काही कायदेशीरबाबी मांडल्या. त्यावर आम्ही चर्चा केली. त्यामुळे ही शिकवणी वगैरे, अभ्यास वगैरे आम्हाला सांगू नका. आम्हाला माहीत आहे. हिंमत असेल तर बोलू नका. तुमच्या दरबारात आम्ही आलो होतो प्रधानमंत्र्यांना भेटायला. मुख्यमंत्री स्वत: आले होते. अजित पवार, अशोक चव्हाण सोबत होते. द्या ना आरक्षण. अभ्यास कुणाला शिकवताय. तुम्ही द्या, मग आम्हाला शिकवा. नाही तर आम्हाला पण शिकवता येतं, असा हल्ला त्यांनी दानवेंवर चढवला

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

शरद पवारांचं स्वत:भोवती राजकारण फिरवत ठेवण्याचं कौशल्य खरोखर मोठं – चंद्रकांत पाटील

News Desk

फडणवीस सरकारची अंध व्यक्तींवर मुजोरी

News Desk

ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचे मारेकरी मोदी-फडणवीसच !ओबीसींच्या हक्कासाठी काँग्रेसचे राज्यव्यापी आंदोलन

News Desk