HW News Marathi
महाराष्ट्र

नीरा नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा, वीर धरणातून 21 हजार 505 क्युसेक्सने विसर्ग!

बारामती। वीर धरण क्षेत्रातील गावांमध्ये व नीरा नदीच्या धरण साखळीमध्ये मागचे तीन दिवस मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे वीर धरणात पाण्याची आवक वाढत असल्याने पाणीपातळीमध्ये वाढ होत आहे. तर शुक्रवारी वीर धरण विद्युत गृहातून रात्री 8:00 वाजता 800 क्युसेक्स वेगाने निरा नदीच्या पात्रात पाण्याचा विसर्ग सुरु झाला होता.. शनिवारी पहाटे 6:00 वाजता 21 हजार 505 क्युसेक्सने पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलाय.

नीरा नदी पात्रात कोणीही जाऊ नये

वीर धरणाच्या विद्युत गृहातून रात्री 8:00 वाजता 800 क्युसेक्स वेगाने निरा नदीच्या पात्रात पाण्याचा विसर्ग सुरु झाला होता. रात्री 12:30 धरणाच्या सांडव्यातून वाजता 4,637 क्युसेक्स वेगाने, 2 वाजता विसर्गाचा वेग वाढवून 12,408 क्युसेक्स, तर पहाटे 6: 00 वाजता 21 हजार 505 क्युसेक्सने पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे.तसेच पावसाच्या प्रमाणानुसार विसर्गामध्ये बदल होऊ शकतो. त्यामुळे निरा नदीकाठच्या नागरीकांनी काळजी घ्यावी, नीरा नदी पात्रात कोणीही जाऊ नये, असे आवाहन निरा पाटबंधारे विभागाकडून करण्यात आले आहे.

गोदावरी नदी पत्रात 6 हजार 310 क्यूसेक वेगाने पाण्याचा विसर्ग

आज सकाळी मराठवाड्याच्या दिशेने गोदावरी नदी पत्रात 6 हजार 310 क्यूसेक इतक्या वेगाने पाण्याचा विसर्ग करण्यात आला. नांदूर मधमेश्वर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पुराचे पाणी दाखल झाल्याने धरणाच्या पाणी पातळीत वाढ होत असल्याने आज सकाळी सहा वाजेपासून 400 क्यूसेक वेगाने विसर्ग सुरू करण्यात आला होता.

पुराचे पाणी कमी होताच पाण्याचा विसर्ग टप्प्याटप्याने बंद होणार

हळूहळू वाढ करत पाण्याच्या विसर्ग 6 हजार 310 वेगाने सुरू असून धरण क्षेत्रातील पाणीपातळी पुराचे पाणी कमी होताच पाण्याचा सुरु असलेला विसर्ग टप्प्याटप्याने कमी करत बंद केला जाणार आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्यात कोरोनामुळे कडक निर्बंध, परीक्षा कशा घ्यायच्या, शिक्षण मंत्र्यांची महत्त्वाची बैठक

News Desk

महाराष्ट्रात ‘कोरोना’चा पहिला बळी, मुंबईत ६४ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू

swarit

प्रजासत्ताकदिनी राजपथावर महाराष्ट्राचा ‘जैवविविधता मानके’ यावर चित्ररथ

Aprna