गुलबर्गा | “आम्ही १५ कोटी आहोत, पण १०० कोटींना भारी आहोत,” असे वादग्रस्त वक्तव्य ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीनचे (एआयएमआयएम) प्रवक्ता वारीस पठाण यांनी केले आहे. गेल्या दोन महिन्यापासून दिल्लीत शाहीन बागमध्ये देशभरात सुधारित नागरिकत्व कायदा (सीएए) आणि राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी (एनआरसी) विरोधात आंदोलने सुरू आहे. या पार्श्वभूमीवर वारीस पठाणांनी वारीस पठाण यांनी कर्नाटकातल्या गुलबर्गामध्ये शनिवारी (१५ फेब्रुवारी) जाहीर सभेतील भाषणात वादग्रस्त वक्तव्य केले आहे.
#WATCH AIMIM leader Waris Pathan: …They tell us that we've kept our women in the front – only the lionesses have come out&you're already sweating. You can understand what would happen if all of us come together. 15 cr hain magar 100 ke upar bhaari hain, ye yaad rakh lena.(15.2) pic.twitter.com/KO8kqHm6Kg
— ANI (@ANI) February 20, 2020
वारीस पठाण म्हणाले की, “स्वातंत्र्य घ्यावे लागेल, आणि जी गोष्ट मागितल्यावर मिळत नाही. तर ती हिसकावून घ्यावी लागणार आहे. हे तुम्ही लक्ष्यात ठेवा. आम्हाला म्हणाले की, तुम्ही तुमच्या माता, भगिनींना पुढे केले, आता फक्त वाघिणी बाहेर पडल्या आहे तर तुम्हाला घाम फुटला. मग तुम्ही समजून जा, जेव्हा आम्ही सगळे एकत्र बाहेर पडलो तर काय होईल. आम्ही १५ कोटी आहोत, पण १०० कोटींनाही भारी आहोत, असे ते म्हणाले. या जाहीर सभेत एमआयएमचे अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवेसी यांची देखील उपस्थिती होती.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.