HW Marathi
Covid-19 देश / विदेश महाराष्ट्र मुंबई राजकारण

देशात रुग्ण बरे होण्याचा दर २३.३ %, तर कोरोनाबाधितांचा आकडा २९, ४३५

नवी दिल्ली। देशात करोना रुग्णांची संख्या २९ हजार ४३५ वर पोहोचली आहे. तर देशात कोरोनामुक्त होणाचा दर वाढून तो २३.३ टक्क्यांवर आला आहे. गेल्या २४ तासांमध्ये देशात करोनाचे १ हजार ५४३ नवे रुग्ण आढळले आहेत. सध्या देशात २१, ६३२ रुग्णांवर उपचार सुरू असून ६,८६८ रुग्ण बरे होऊन घरी गेलेले आहेत. तर आतापर्यंत ९३४ लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव अग्रवाल यांनी आज (२८ एप्रिल) पत्रकार परिषदेत दिली आहे. गेल्या २४ तासांमध्ये बरे झालेल्या रुग्णांची संख्या ६८४ इतकी आहे, असे ही त्यांनी सांगितले.

भारतात १६ जिल्हे असे आहेत की, गेल्या २८ दिवसांपासून एकही कोरोनाबाधित रूग्ण आढळले नाही. लाखीसराई (बिहार), बिलासपूर (छत्तीसगढ), दुर्ग (छत्तीसगढ), राजनांदगाव (छत्तीसगढ), दक्षिण गोवा (गोवा), कोडागू (कर्नाटक), चित्रदुर्ग (कर्नाटक), दावणगेरे (कर्नाटक), इंफाळ पश्चिम (मणिपूर), ऐझॉल (मिझोरम), गोंदिया (महाराष्ट्र), माहे (पुदुच्चेरी), प्रतापगढ (राजस्थान), भद्राद्री कोथागुदेम (तेलंगणा), पौरी गढवाल (उत्तराखंड) आणि शिवपुरी (मध्य प्रदेश) या जिल्ह्यांमध्ये गेल्या २८ दिवसांपासून कोरोनाचा एकही रुग्ण नाही.महाराष्ट्रातल्या गोंदियाचा यात समावेश आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

“प्लास्मा थेरपीबाबत अद्याप संशोधन सुरू आहे. त्यामुळे प्रायोगिक तत्त्वावर प्लास्मा थेरपीचा वापर व्हावा. कोरोनाच्या उपचारासाठी प्लाझ्मा थेरपी उपयुक्त ठरत असल्याचा कोणताही पुरावा आपल्याकडे सध्या उपलब्ध नाही. त्यामुळे, मार्गदर्शक सुचनांनुसारच प्लाझ्मा थेरपीचा वापर केला जावा. अन्यथा संबंधित रुग्णाच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो”, असा इशारा आज केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आला आहे.

Related posts

लेखकाने क्षमा मागितली असून पुस्तकही मागे – प्रकाश जावडेकर

News Desk

साध्वी प्रज्ञा सिंह यांच्याविरोधात निवडणूक आयोगाकडून तक्रार दाखल

News Desk