HW News Marathi
Covid-19

राजभवनातील तब्बल 16 जणांना कोरोनाची लागण, राज्यपाल विलगीकरणामध्ये…

मुंबई | कोरोना विषाणूच्या संक्रमणापासून राष्ट्रपती भवन,मंत्रालय यांचाही बचाव झालेला नाही.आता महाराष्ट्रातून महत्वाचे स्थान असणाऱ्या राजभवनातही कोरोनाचा शिरकाव झाला आहे. राजभवनातील तब्बल 16 जणांना कोरोनाची लागण झाली आहे.महत्वाची गोष्ट अशी की याआधी राजभनवात काम करणाऱ्या एका ज्युनियर इलेक्ट्रिशियनला कोरोनाची लागण झाली होती.त्यानंतरचं राजभवनातील 100 लोकांची चाचणी केली गेली होती.

100लोकांच्या चाचणीनंतर राजभवनातील तब्बल 16 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे. त्यांनाआता उपचारासाठी रूग्णालयात दाखल केलं गेलं आहे.

समाधानाची बाब म्हणजे राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची तब्येत उत्तम असून त्यांनी सुरक्षेच्या दृष्टीने त्यांनी स्वत:ला ( Isolate )विलगीकरण करून घेतलं आहे. त्यांनी विलगीकरण केल्याने येत्या काही दिवसांत ते कोणासही भेटण्यास उपलब्ध होणार नाहीत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

महानायक अमिताभ बच्चन कोरोनाला हरवून सुखरूप घरी परतले !

News Desk

#RathYatra : सर्वोच्च न्यायालयाच्या परवानगीनंतर जगन्नाथ रथ यात्रेला आजपासून सुरुवात

News Desk

दोन्ही व्हॅक्सीन सुरक्षित;आरोग्य कर्मचार्‍यांनी व्हॅक्सीनेशन कार्यक्रमात सहभागी व्हावे – राजेश टोपे

News Desk