HW News Marathi
महाराष्ट्र

पुणे बेंगलोर महामार्गावर अपघात, १७ जणांचा मृत्यू, २० जखमी

पुणे बेंगलोर महामार्गावरचा खंबाटकी बोगदा ओलांडून पुण्याकडे जात असलेल्या ट्रकला मंगळवारी पहाटे एस कॉर्नर येथे भीषण अपघात झाला मंगळवारी पहाटे खंबाटकी बोगद्यात पुण्याच्या दिशेने सुमारे ३५ पेक्षा जास्तकामगार घेऊन जाणारा ट्रक एस कॉर्नर येथे आल्यानंतर कठड्याला धडकल्याने हा अपघात झाला.

कर्नाटकच्या विजापूर जिल्ह्यातील तिकोटा येथून शिरवळच्या औद्योगिक वसाहतीत कामासाठी ते कामगार निघाले होते.मालवाहतूक करणाऱ्या या टेम्पोत ( केए – ३७ / ६०३७ ) ३५ पेक्षाही जास्त कामगार दाटीवाटीने बसले होते. खंबाटकी बोगदा ओलांडल्यानंतर नेहमीच्या अपघातग्रस्त एस कॉर्नरवर हा भरधाव टेम्पो उलटला.

रस्त्याच्या कडेला बांधलेल्या सहा फुटी कठड्यावरून हा टेम्पो बाहेर फेकला गेला. टेम्पोत बांधकामाचे अवजड साहित्य असल्यामुळे यातील कामगारांना याचा फटका बसला. चार महिला अन् एक मुलगायांच्यासह सुमारे १७ जण जागीच ठार तर बाकीचे २० गंभीर जखमी झाले. या अपघाताची माहिती पोलिसांना मिळताच त्यांनी व परिसरातील ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. ट्रकमधील जखमींना बाहेरकाढण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असताना प्राथमिक माहितीनुसार जागीच १३ जणांचा तर उपचारावेळी ४ अशाप्रकारे एकूण १७ जणांचा मृत्यू झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्यसभेची पोटनिवडणुक बिनविरोध होण्यासाठी काँग्रेसच्या हालचाली?

News Desk

सरकारकडून शेतकऱ्यांना खुशखबर, २० एप्रिलपासून कापूस विक्री होणार सुरु

News Desk

पाहुणे माझ्याकडे नव्हे आमच्या नातेवाईकांकडे आले होते, IT छापेमारीवर अजित पवारांची प्रतिक्रिया

News Desk