HW News Marathi
महाराष्ट्र

नितेश राणेंसह १८ कार्यकर्त्यांना २३ जुलैपर्यंत न्यायालयीन कोठडी

कणकवली | उपअभियंता प्रकाश शेडेकर यांच्यावर चिखलफेक केल्याप्रकरणी कणकवलीच्या दिवाणी न्यायालयाने आमदार नितेश राणे आणि त्यांच्या १८ कार्यकर्त्यांना २३ जुलैपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. दरम्यान, नितेश राणे आणि त्यांच्या १८ कार्यकर्त्यांना शुक्रवारी (५ जुलै) कणकवलीच्या दिवाणी न्यायालयात हजर करण्यात आले होते. यावेळी न्यायालयाने त्यांना ९ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती. मात्र, आता न्यायालयाने पोलीस कोठडीत बदल करत त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

नेमके काय आहे प्रकरण ?

मुंबई-गोवा महामार्गावर पडलेल्या खड्ड्यांना जबाबदार धरत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे उपअभियंता प्रकाश शेडेकर यांनी नितेश चिखलाच्या पाण्याने आंघोळ घातली. नितेश यांच्यासह नगराध्यक्ष समीर नलावडे आणि स्वाभिमान कार्यकर्त्यांनी शेडेकर यांना गडनदी पुलाला बांधून ठेवले होते. एवढेच नव्हे तर “सर्वसामान्य जनता रोज चिखल मारा सहन करते. तुम्ही पण त्याचा अनुभव घ्या”, असे म्हणत शेडेकर यांच्या डोक्यावर चिखलाच्या बादल्या ओतल्या.

“कणकवली नगरी तुंबवायचा अधिकार तुम्हाला कोणी दिला ?”, असे विचारत नितेश यांच्यासह स्वाभिमान कार्यकर्त्यांनी उपअभियंता प्रकाश शेडेकर यांना गडनदी पूल ते जानवली नदी पुलापर्यंत पायी चालत नेऊन चिखल आणि खड्ड्यांची वस्तुस्थिती दाखवली. यावेळी येत्या दोन दिवसांत सर्व्हिस मार्ग सुरक्षित करण्याचे आश्वासन प्रकाश शेडेकर यांनी दिले होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

शिवसेनेला आणखी एक धक्का; माजी खासदार आनंदराव अडसूळ यांना ईडीचे समन्स!

News Desk

प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावण्याचा प्रयत्न! – उपमुख्यमंत्री

Aprna

बीडच्या सेक्स रॅकेटमधील दोन्ही अंकलला अटक

News Desk