HW News Marathi
महाराष्ट्र

पारदर्शक मुख्यमंत्र्यांचा 18 हजार कोटींचा घोटाळा

र्मुंबई- पारदर्शकतेचा टेंभा मिरवणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस खरे तर व्यापारी, दलाल, कंत्राटदार यांचे अदृश्य पाठिराखे असून त्यांनी आरे येथी कारशे प्रकल्पात 18 हजार कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप कॉँग्रेसचे नेते संजय निरूपम यांनी पत्रकार परिषद घेऊन केला आहे. आरे येथे मेट्रो कारशेडसाठी केवळ बारा हेक्टर जागा पुरेशी असताना राज्य सरकारने आरे येथील कारशेडसाठी तीस हेक्टर जागा ताब्यात घेण्याचा घाट घातला आहे. कारशेडच्या नावाखाली तब्बल १८ हेक्टर जागा बिल्डरांच्या घशात घालण्याचा सरकारचा डाव असल्याचा आरोप निरूपम यांनी मंगळवारी केला.

मुंबई काँग्रेस कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत संजय निरुपम म्हणाले की, देशभरात जिथे मेट्रो आहे तिथे १२ हेक्टरमध्ये कारशेड उभारण्यात आली आहेत. मात्र,राज्यातील फडणवीस सरकार आरे येथील ३० हेक्टर जमीन ताब्यात घेत आहे. १२ हेक्टरमध्ये कारशेड उभारायचे आणि उर्वरित १८ हेक्टर जमीन व्यावासायिक आणि बिल्डरांना आंदण दिली जाणार आहे. आरेतील या जमीनीचा सध्याचा दर पाहता हा तब्बल १८ हजार कोटींच्या भ्रष्टाचार असल्याचा आरोप निरूपम यांनी केला. यावेळी आरे बचाव समितीचे डी. स्टेलीयान, बिजू अगस्तीन, प्रिया मिश्रा व अमृता भट्टाचार्य उपस्थित होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

लॉकडाऊननंतर सिद्धिविनायक मंदिर भाविकांसाठी खुले

News Desk

जाणून घ्या…राज्य सरकारने मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतलेले महत्वाचे निर्णय

Aprna

“….तर उद्धव ठाकरे सर्व काँग्रेस नेत्यांच्या जयंती-पुण्यतिथीला वाकून अभिवादन” – अतुल भातखळकर

News Desk
Uncategorized

आता घाटी रुग्णालयात तीन बालकांचा मृत्यू

News Desk

औरंगाबाद-येथील घाटी रुग्णलायतील प्रसूती विभागात रविवारी रात्री तीन बालकांचा मृत्यू झाल्याने एकच खळबळ उडाली. मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी नातेवाईकांना गोरखपूर घटनेची आठवण झाली. मृत बेगमपुरा स्मशानभूमीत सोमवारी सकाळी सहा वाजता एकाच वेळी अंत्यसंस्कार करण्यात आले. ही विदारक घटना पाहून रोज सरणाची व्यवस्था करणाऱ्या स्मशानजोगीच्याही डोळ्यात पाणी आले.

रविवारी मृत्युमुखी पडलेल्या तीन बालकांत दोन मुली आणि एका मुलाचा समावेश आहे. माया मुकेश मगरे (३०, रा. ब्रिजवाडी), पूजा पांडुरंग बखले (रा. डोंगरगाव, ता. अंबड), अर्चना विनायक मुंढे (३०, रा. धावणी मोहल्ला) अशी मृत्युमुखी पडलेल्या नवजात शिशूंच्या आईची नावे आहेत. विनायक मुंढे (३६) त्याची पत्नी अर्चना हिला रविवारी सातच्या सुमारास अचानक कळा येऊ लागल्या. त्याने तिला तत्काळ घाटीतील प्रसूती विभागात दाखल केले. सात वाजून ४० मिनिटांनी अर्चना प्रसूत झाली. मात्र मुलगा झाला आहे की मुलगी हे त्याला कोणीच सांगितले नाही. पुरुषांना प्रसूती विभागात प्रवेश नसल्यामुळे त्याला बाहेरच थांबावे लागले. अखेर सकाळी सहा वाजता विनायकच्या हातात मृत बाळ ठेवण्यात आले. माझ्या बाळाचा मृत्यू कशामुळे झाला? असे तो घाटीतील कर्मचाऱ्यांना विचारत होता. मात्र, त्याला उत्तर मिळाले नाही. काही मुले जन्मल्यानंतर केवळ पंधार मिनिटे जगतात, असे डॉक्टरांनी सांगितले.

Related posts

राष्ट्रवादीच्या खासदारांनो दिल्लीला जाऊ नका ,शरद पवारांची सुचना

Arati More

रघुराम राजन यांना मिळून शकते अमेरिकेने बँकेवर उच्च स्थान

News Desk

ते हॉट स्पॉटमध्ये नाहीत, न हॉट स्पॉटला जाणार आहेत, मग काय प्रॉब्लेम?

News Desk