HW Marathi
Covid-19 देश / विदेश महाराष्ट्र

पुण्याहून १ किलो चांदीची वीट जाणार अयोध्येला !

पुणे| अयोध्येत प्रभू श्रीराम मंदिराच्या उभारणीसाठी पुण्यातील माजी सैनिक स्वर्गीय दरोगा सिंग यांच्या कुटुंबीयांनी एक किलो चांदीची वीट अर्पण केली आहे .आज सिंग कुटुंबियांच्या वतीने नवीन सिंग यांनी भाजपचे शहराध्यक्ष माजी आमदार जगदीश मुळीक यांच्या हस्ते हि वीट अर्पण केली .हि वीट विनीत वाजपेयी हे स्वतःला अयोध्येत घेऊन जाणार आहेत.

येत्या 5 ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अयोध्येत प्रभू श्रीराम मंदिराचे भूमिपूजन होणार आहे. सिंग कुटुंबीयांनी बनवलेली ही वीट शुद्ध चांदीची असून यात नऊ धातू समाविष्ट करण्यात आले आहेत.

पुण्यातील प्रसिद्ध सराफ रांका ज्वेलर्स यांनी हि वीट तयार केली आहे.मंदिर निर्मिती मध्ये पुणे शहर भाजपचा छोटासा वाटा असावा यासाठी ही वीट मंदिर समितीकडे देण्यात येणार आहे अशी माहिती पुणे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी दिली आहे .पुणेकरांनी भूमिपूजनाच्या दिवशी घरावर गुढी उभारून या आनंदी क्षणात सहभाग घ्यावा असे आवाहनही यावेळी मुळीक यांनी केले आहे.

 

Related posts

जर्मनीने असे काय केले ज्याने कोरोनामूळे होणारे मृत्यूचे प्रमाण कमी झाले?

rasika shinde

अभाविपचे सेल्फी विथ कॅम्पस अभियान, महिला सशक्तीकरणासाठी ‘मिशन साहसी’

News Desk

सुषमा स्वराज खोटारड्या आहेत, चीनचा आरोप

News Desk