HW News Marathi
महाराष्ट्र

खानदेशात पहिल्या कोरोनाबाधिताचा मृत्यू

जळगाव | जळगावमध्ये काल (१ एप्रिल) शहरात आढळून आलेला कोरोनाच्या रूग्णाचा मृत्यू झाल्याने प्रचंड खळबळ उडाली असून यामुळे शहरवासियांनी काळजी घेण्याची आवश्यकता आहे. हा खान्देशातील कोरोनाचा पहिलाच बळी ठरला आहे. दरम्यान, काल रात्री शहरातील सालार नगर परिसरातील व्यक्ती कोरोनाचा पॉझिटीव्ह असल्याचे आढळून आले होते. त्याच्यावर जिल्हा रूग्णालयात उपचार सुरू होते.

आज (२ एप्रिल) दुपारी याचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. हा रूग्ण सिव्हील हॉस्पीटलमध्ये दाखल झाला तेव्हाच त्याची प्रकृती अतिशय खालावली होती. कोरोना पॉझिटीव्ह झाल्यानंतर त्याच्यावर उपचार सुरू करण्यात आले होते. आज सकाळी त्याची प्रकृती अजून गंभीर बनल्याने त्याला अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले होते. यानंतर दुपारी तीनच्या सुमारास त्याचा मृत्यू झाल्याचे शासनाकडून जाहीर करण्यात आले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

TET Exam Scam : पुणे पोलिसांकडून कृषी विभागातील अधिकारी सुशील खोडवेकर यांना अटक

Aprna

मुंबईतील २ सहकारी बँकांसह ४ बँकांवर RBI ची कारवाई

News Desk

तुम लाख कोशिश करो मुझे हराने की,बदनाम करने की …मुंडेंनी शायरीतून ठणकावलं !

News Desk