HW News Marathi
Covid-19

राज ठाकरेंच्या ‘कृष्णकुंज’वरील २ कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण

मुंबई । राज्यात कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढतो आहे. तासागणिक वाढत जाणार आकडा राज्याची चिंता वाढवत आहे. अगदी सर्वसामान्यांपासून राजकारण्यांपर्यंत कोणीही या विळख्यातून सुटलेले नाही. त्यातच हा आता मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या कृष्णकुंजपर्यंत कोरोनाचा संसर्ग पोहोचला आहे. राज ठाकरेंच्या काम करणाऱ्या २ जणांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान, या दोन्ही जणांना आता रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

राज ठाकरेंच्या ३ सुरक्षा रक्षकांनाही यापूर्वी कोरोनाची लागण झाल्याची वृत्त समोर आले होते. मात्र, या तिघांनीही आता कोरोनावर यशस्वी मात केली असून ते आता कोरोनामुक्त झाले आहेत. मात्र, त्यानंतर आता आणखी २ जणांचे कोरोनाचे अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर निश्चितच चिंता वाढली आहे. दरम्यान, या दोघांमध्येही कोरोनाची लक्षणे आढळून आल्यानंतर त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली आणि आता त्यांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पालघर सामूहिक हत्याकांडानंतर दत्तात्रय शिंदे जिल्ह्याचे नवे पोलीस अधीक्षक

News Desk

कोरोनाला गांभीर्याने घेऊ नका असा सल्ला देणाऱ्या ‘त्या’ डॉक्टरचे निधन

News Desk

पुण्यात कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या १०० वर

News Desk