मुंबई | कोरोना व्हायरस राज्यात वेगाने फैलावत असला तरी मुंबईत आज (११ मार्च) कस्तुरबा रुग्णालयात कोरोनाची लागण झाल्याच्या संशयावरुन ६ जणांची वैद्यकीय चाचणी झाली त्यापैकी ४ जण कोरोना निगेटीव्ह आले आहेत. तर २ जण कोरोना पॉझिटीव्ह निघाले आहेत. दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील कोरोना संशयित आणि बाधित रुग्णांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगितले आहे.
याआधी, पुण्यात ५ जणांना कोरोनाची लागण झालेल्यांसोबत यवतमाळ जिल्ह्यातील ११ जणांनी प्रवास केल्याचे शासकीय प्रशासनाकडून उघडकीस आले होते. दरम्यान, या ११ जणांना घरातून बाहेर न जाण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. दरम्यान, अहमदनगरच्या आणखी ४ प्रवाशांचा शोध महापालिकेच्या आरोग्य विभागाने घेत त्या सगळ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली असून त्यांच्यामध्ये कोरोनाची कोणतीही लक्षणे आढळली नाही आहेत.
कोरोना बाबतीतील महत्त्वाच्या बाबी
- भारतातील कोरोनाग्रस्तांची संख्या ५६ वर
- महाराष्ट्रात कोरोनाग्रस्तांची संख्या ७ वर
- कर्नाटकात ९८ हजार लोकांची कोरोना चाचणी करण्यात आली
- अनेक शहरांमध्ये चित्रपटगृहे, शाळा बंद ठेवण्याचे आदेश
- मुंबईतील ६ संशयीतांपैकी ४ जणांचे कोरोना रिपोर्ट निगेटीव्ह
- मुंबईत २ जणांना कोरोनाची लागण