मुंबई | कोरोनाचा प्रादुर्भाव हा कमी होताना इतका दिसत नाही आहे. वेगाने पसरणाऱ्या या कोरोनाने आता भारतीय नौदलातही प्रवेश केला आहे. एकूण २० नौसैनिकांचे रिपोर्ट हे कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. मुबईतील नौदलाच्या रुग्णालयात या नौसैनिकांना क्वॉरटाईनमध्ये ठेवण्यात आले आहे.
20 Navy personnel have tested positive for #COVID19 at a naval base in Mumbai. The first case was reported on April 7 at the INS Angre base there. All other persons who came in contact with these affected personnel have also been tested: Navy officials
— ANI (@ANI) April 18, 2020
‘आयएनएस आंग्रे’ या नौदलाच्या प्रशासकीय तळावरील हे सैनिक आहे. विशेष म्हणजे त्यांच्यात कोरोना सदृश कोणतीही लक्षणे नव्हती. ‘आयएनएस आंग्रे’मध्ये हे सर्व जवान एकाच ठिकाणी राहत होते. यानंतर, बाधित परिसर आणि ‘आयएनएस आंग्रे’ या इमारतीला सील करण्यात आला आहे.
दरम्यान, भारतात कोरोनाबाधितांचा आकडा हा १४,३७८ झाले आहे. तर महाराष्ट्रात हा आकडा ३३२० वर पोहोचला आहे. देशात कोरोनामूळे ४०० हून अधिक जणांना जीव गेला आहे तर महाराष्ट्रातही मृत्यूचा आकडा हा १५० च्या पूढे गेला आहे.
India's total number of #COVID19 cases crosses the 14,000 mark; currently at 14,378 (including 11,906 active cases, 1992 cured/discharged/migrated and 480 deaths): Ministry of Health and Family Welfare pic.twitter.com/8kVxco0F3J
— ANI (@ANI) April 18, 2020
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.