HW News Marathi
महाराष्ट्र

२०१९-२० मध्ये २००० रुपयांच्या नोटांची छपाईच नाही!

मुंबई | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अचानक १००० रुपयांची आणि ५०० ची जुनी नोट बंद करत २००० रुपयांची नवी नोट चलनात आणली. मात्र, भारतीय रिझर्व्ह बँकने२०१९-२० मध्ये २००० रुपयांच्या नव्या नोटांची छपाई केलेली नाही अशी माहिती समोर येत आहे. यादरम्यान २०००च्या नोटांचा चलनातील वापर देखील कमी झालेला दिसत आहे. रिझर्व्ह बँकेच्या २०१९-२० च्या वार्षिक अहवालात ही महत्त्वाची माहिती देण्यात आली आहे.

या वार्षिक अहवालानुसार, मार्च २०१८ च्या अखेरीस चलनात आलेल्या २००० रुपयांच्या नोटांची संख्या ही ३३,६३२ लाख होती, मात्र मार्च, २०१९ च्या अखेरपर्यंत त्यात घट होऊन ३२,९१० लाखांवर गेली. आणि मार्च,२०२० च्या अखेरीस तर चलनात असलेल्या या नोटांची संख्या आणखी कमी होत २७,३९८ लाखांवर गेली.

चलनातील एकूण नोटांमध्ये मार्च २०२० च्या अखेरपर्यंत २००० रुपयांच्या नोटांचा वाटा २.४ टक्के राहिला. मार्च २०१९ च्या अखेरीस हा वाटा ३ टक्के तर मार्च २०१८ च्या अखेरपर्यंत हा वाटा ३.३ टक्के इतका होता, असेही आरबीआयच्या या वार्षिक अहवालात म्हटले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

भावना गवळींना वर्षावर नो एंट्री, मुख्यमंत्र्यांची अर्धा तास वाट बघून भेटीशिवायच परतल्या!

News Desk

करुणा धनंजय मुंडे यांच्याकडून नव्या पक्षाची घोषणा; परळीमध्ये निवडणूक लढवणार?

Aprna

पंकजा मुंडेंना ऑफर फक्त मुख्यमंत्रीच देऊ शकतात, संजय राऊतांचा खुलासा

News Desk