HW News Marathi
महाराष्ट्र

राज्यात २२१ नवे रुग्ण, तर कोरोनाबाधितांची संख्या १९८२ वर पोहोचली

मुंबई। राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या १ हजार ९८२ वर पोहोचली आहे. राज्यात आज (१२ एप्रिल) २२१ नवीन रुग्णांची नोंद झाली असून २२ जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यात आतापर्यंत कोरोनामुळे १४९ जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यातील एकूण करोनाबाधितांची संख्या दोन हजारांच्या जवळपास पोहोचली आहे.

आजपर्यंत पाठवण्यात आलेल्या ५२ हजार १०९ नमुन्यांपैकी ३७ हजार ९६४ जणांचे प्रयोगशाळा नमुने कोरोना करता निगेटिव्ह आले आहेत. तर १ हजार ९८२ जण पॉझिटिव्ह आले आहेत. २१७ कोरोनाबाधित रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. सध्या राज्यात १६१६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. सध्या राज्यात ६१ हजार २४७ व्यक्ती घरगुती अलगीकरणात असून ५०६४ जण संस्थात्मक क्वॉरंटाईनमध्ये आहेत.

राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या

मुंबई – १२९८

पुणे – २४९

पिंपरी-चिंचवड

ठाणे – ५०

कल्याण – ४६

नवी मुंबई – ४५

मीरा भाईंदर – ४२

वसई-विरार – २१

पनवेल – ८

पालघर – ४

सातारा – ६

सांगली – २६

नागपूर – २८

अहमदनगर – २६

बुलडाणा – १३

औरंगाबाद – १९

लातूर – ८

अकोला – १२

मालेगाव – १५

रत्नागिरी – ५

यवतमाळ – ४

उस्मानाबाद – ४

अमरावती – ५

कोल्हापूर – ६

उल्हासनगर – १

नाशिक – ३

जळगाव – २

जालना – १

हिंगोली -१

वाशिम – १

गोंदिया – १

सिंधुदुर्ग – १

बीड – १

धुळे – १

रायगड – १

भिवंडी – १

सोलापूर – १

इतर राज्ये – ९

एकूण – १९८२

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

खेडमध्ये घरांवर डोंगर कोसळला, 17 जण ढिगाऱ्याखाली

News Desk

माझ्या शिवसेना प्रवेशाच्या बातम्या म्हणजे केवळ अफवाच !

News Desk

काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांची विरोधी पक्षनेते पदी निवड

News Desk