HW News Marathi
महाराष्ट्र

#COVID19 : राज्यात कोरोनाबाधितांची संख्या ८९१ वर, धारावीमधील रुग्णांच्या संख्येत वाढ

मुंबई | कोरोनाचा प्रादुर्भाव महाराष्ट्रात वेगाने वाढत आहे. आज (७ एप्रिल) राज्यात २३ नवे रुग्ण वाढल्याने राज्यातील रुग्णांची एकूण संख्या ८९१वर गेली आहे. धारावीमध्ये एकाच कुटुंबातील पिता-पुत्रांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती एएनआयने दिली आहे. यामुळे धारावीसारख्या झोपडपट्टीत कोरोना विषाणून हात पाय पसरवित आहे. यामुळे संपूर्ण परिसरात भीत आणि चिंतेचे वातावरण आहे. धारावीतील करोना रुग्णांची संख्या ७वर पोहोचली आहे. यामुळे आता एकट्या मुंबईतील करोना रुग्णांचा आकडा ५२६वर गेला आहे. मुंबईत १०, पुण्यात ४, नगरमध्ये ३, नागपूर आणि बुलडाण्यात प्रत्येकी दोन व सांगलीत एक रुग्ण वाढला आहे.

कोरोनाचे हे रुग्ण धारावीमधील बलिगा नगरमध्ये आढळून आले आहे. हे दोन्ही रुग्ण एकाच कुटुंबातील असून एका ८० वर्षीय पिता आणि ४९ वर्षी पुत्र असे दोन्ही रुग्ण आहे. या दोघांना कोरोनाची लागण झाल्याचे कळाल्यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून पालिकेने त्यांचे घर आणि धारावीतील बलिगा नगर सील केला आहे. याआधीच एका व्यक्तींस कोरोनाची बाधा झाली असून त्यांचा मृत्यू झाला आहे. हे दोन नवे रुग्ण कोणाकोणाच्या संपर्कात आले होते, याची माहिती घेतली जात आहे.

राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या

मुंबई – ५२६

पुणे (शहर-ग्रामीण) – १४५

सांगली – २६

ठाणे मंडळ – ९६

नागपूर – १९

अहमदनगर – २६

यवतमाळ – ४

उस्मानाबाद – ३

लातूर – ८

औरंगाबाद – १०

बुलढाणा – ७

सातारा – ५

जळगाव – २

कोल्हापूर – २

रत्नागिरी – २

नाशिक – २

सिंधुदुर्ग – १

गोंदिया – १

वाशिम -१

अमरावती – १

हिंगोली -१

जालना – १

इतर राज्य – २

एकूण -८९१

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘उद्वव ठाकरेंना जे करायचयं ते करु दे, मला जे करायचयं ते मी करणार’, अटकेनंतर नारायण राणेंची प्रतिक्रिया

News Desk

परदेश शिष्यवृत्तीसाठी आता ६ लाख रुपये उत्पन्नाची मर्यादा

News Desk

५वी आणि ८वीची शिष्यवृत्ती परीक्षा पुढे ढकलली, वर्षा गायकवाडांची घोषणा

News Desk