मुंबई | महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढली आहे. तर मुंबईतील धारावी हे कोरोनाचे हॉटस्पॉटमध्ये दररोज रुग्णांच्या संख्येत वाढत होताना दिसत आहे. धारावीमध्ये आज (९ मे) २५ नव्या रुग्णांची नोंद झाली असून एकाचा मृत्यू झाला आहे. यामुळे आता धारावीतील एकूण रुग्णांची संख्या ८३३वर गेली आहे. तर मृतांचा आकडा २७ वर गेला आहे. तसेच आतापर्यंत २२२ जणांना घरी सोडण्यात आले आहे.
25 new COVID19 positive cases, 1 death reported in Mumbai's Dharavi today; till now 833 positive cases and 27 deaths have been reported. 222 people discharged today: Brihanmumbai Municipal Corporation pic.twitter.com/aAPXH4khJP
— ANI (@ANI) May 9, 2020
राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या २० हजार २२८ झाली आहे. आज ११६५ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. राज्यात आज ३३० कोरोनाबाधित रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत राज्यभरात ३८०० रुग्ण बरे झाले आहेत अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.
राज्यात आज 1165 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली व एकूण संख्या आता 20228 अशी झाली आहे. आज नवीन 330 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण 3800 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत.#CoronaVirusUpdates #MeechMazaRakshak #मीचमाझारक्षक #मैंहीमेरारक्षक
— Rajesh Tope (@rajeshtope11) May 9, 2020
आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या २ लाख २७ हजार ८०४ नमुन्यांपैकी २ लाख ०६ हजार ४८१ जणांचे प्रयोगशाळा नमुने कोरोना करिता निगेटिव्ह आले आहेत तर २० हजार २२८ जण पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात २ लाख ४१ हजार २९० लोक होम क्वारंटाईनमध्ये असून १३ हजार ९७६ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.