HW News Marathi
महाराष्ट्र

‘कोरोनावेग थंडावतोय’, गेल्या २४ तासात ३०,०९३ रुग्ण!

नवी दिल्ली। भयानक वेगाने पसरणाऱ्या कोरोना च्या या व्हायरसचा जगभरात उद्रेक पाहायला मिळत आहे. कोरोनाग्रस्तांची संख्या ही तब्बल १८ कोटींच्या वर गेली असून लाखो लोकांचा मृत्यू झाला आहे. तर दुसरीकडे भारतात कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत. काही दिवसांपूर्वी देशामध्ये कोरोनाचा धोका वाढला असून रुग्णांची संख्यादेखील वाढत होती. मात्र आता सध्या देशात कोरोनाचा वेग मंदावताना दिसत असला तरी कोरोनाग्रस्तांच्या संख्येने तब्बल तीन कोटींचा टप्पा पार केला आहे. मात्र असं असताना याच दरम्यान आता मोठा दिलासा मिळाला आहे. देशातील नव्या रुग्णांच्या संख्येत मोठी घट झालेली पाहायला मिळाली १२५ दिवसांतील नीचांक आहे. कोरोनाबाबत आता समाधानकारक आकडेवारी समोर आली आहे.

आरोग्य मंत्रालयाने दिलेली माहिती

मागच्या गेल्या २४ तासांत देशभरात कोरोनाचे ३० हजार ९३ नवे रुग्ण आढळून आले आहेत. भारतातील कोरोनाग्रस्तांची एकूण संख्या तीन कोटींवर पोहोचली असून, कोरोनामुळे देशात चार लाखांहून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे . आरोग्य मंत्रालयाने याबाबत ही माहिती दिली आहे. मंगळवारी (२० जुलै ) केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार , देशात गेल्या २४ तासांत कोरोनाचे ३०,०९३ नवे रुग्ण आढळून आले आहेत . त्यामुळे देशातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या तब्बल तीन कोटींवर पोहोचली आहे. तर हा रिकव्हरि रेट हा ९७.३७ टक्क्यांवर पोहोचला आहे.

किडनी लिव्हरवर परिणाम

देशातील कोरोनाग्रस्तांपैकी ४,०६,१३० रुग्णांवर उपचार सुरू आहेत . तर लाखो लोक उपचारानंतर बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. तर ५० टक्के रुग्णांना हेल्थ कॉम्प्लिकेशन्स म्हणजेच आरोग्यविषयक समस्या जाणवत आहेत. भयानक बाब म्हणजे किडनी आणि लिव्हरवर गंभीर परिणाम होत असल्याचं देखील आता समोर आलं आहे. लँसेटच्या रिपोर्टमधून याबाबत माठा खुलासा करण्यात आला आहे . लॅसेटच्या रिपोर्टने चिंतेत भर टाकली आहे. त्यांनी केलेल्या अभ्यासात जवळपास ५० टक्के रुग्णांमध्ये काहीनाकाही आरोग्य विषयक समस्या आहेत . कोरोनातून बऱ्या झालेल्या लोकांना विविध समस्यांचा सामना करावा लागत आहे.

महाराष्ट्राची काय आहे परिस्थिती?

राज्यात गेल्या काही दिवसांमध्ये कोरोना रुग्णसंख्येत वाढ झाली होती. या रुग्णसंख्येत आज (१९ जुलै) मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. तर कोरोनातून बरे होणाऱ्यांची संख्या ही दुप्पट झाली आहे. त्यामुळे रिकव्हरी रेटमध्येही वाढ झाली आहे. तसेच मृत्यूसंख्येत ही घट झाली आहे. राज्यात आज एकूण ६ हजार १७ कोरोना बाधितांची नोंद झाली आहे. दिवसभरात एकूण १३ हजार ५१ जण कोरोनामुक्त झाले आहे.

राज्यात आतापर्यंत एकूण ५९ लाख ९३ हजार ४०१ जण कोरोनामुक्त झाले आहेत. यामुळे राज्याच्या रिकव्हरी रेटमध्ये वाढ झाली आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचा दर हा आता ९६.३५ % इतका झालाय.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

डॉ. सावंत यांच्या पुस्तकांनी दिला जंगलभ्रमंतीचा सुंदर अनुभव! – उद्धव ठाकरे

Aprna

‘परीक्षेचं हॉल तिकीट दाखवा आणि लोकलचं तिकीट मिळवा!’

Jui Jadhav

“मराठा समाजाला आरक्षण द्या नाहीतर…”,चंद्रकांत पाटील यांचा सरकारला गंभीर इशारा  

News Desk