मुंबई | राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा हा ७ हजारांच्या पुढे गेला आहे. तसेच, कोरोनावर यशस्वीपण मात करत बरे होणाऱ्यांचीही संख्या वाढत आहे. काही दिवसांपूर्वी मुंबईतील पत्रकारांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले होते. यापैकी ३१ पत्रकारांनी कोरोनावर मात केली आहे. त्यांची कोरोनाची दुसरी चाचणी केल्यानंतर तो रिपोर्ट निगेटिव्ह आला होता, त्यामूळे त्यांना आज (२६ एप्रिल) रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. या सर्वांना १४ दिवस होम क्वॉरंटाइन राहण्याचा सल्ला देण्यात आल्याची माहिती महापालिकेने दिली आहे.
दरम्यान, शीवमधील प्रतीक्षा नगर येथील प्रेस एन्क्लेव्हमधील दोन पत्रकार कोरोनावर मात करून घरी परतल्यानंतर त्यांचे स्वागत करण्यात आले आहे. या दोघांचेही अहवाल निगेटिव्ह आले होते. त्यामूळे त्यांची कोरोनावरची ही यशस्वी मात इतर बाधितांना प्रेरणा देणारी आहे.
#WATCH Mumbai: Housing Society members of Press Enclave in Pratiksha Nagar, Sion East welcome two journalists by applauding for them, as they return home after getting discharged today from hospital. The second #COVID19 report of the two journalists came negative. pic.twitter.com/2Tz63TwxxK
— ANI (@ANI) April 26, 2020
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.