HW News Marathi
Covid-19

पुण्यात १२ तासांत ३५ नवे रुग्ण, एकूण कोरोनाबधितांचा संख्या ३ हजार १६९ वर

पुणे । राज्यात कोरोना बाधितांच्या आकड्याने २४ हजारांचा आकडा ओलांडला आहे. राज्यात कोरोना मुंबई आणि पुण्यात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आहेत. गेल्या बारा तासांत ३५ नवे कोरोना रुग्णांची नोंद झाली असून पुणे जिल्ह्यातील एकूण संख्या ३ हजार १६९ वर पोहोचली असून असून १ हजार २४० कोरोना बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. अ‍ॅक्टीव रुग्ण संख्या १ हजार ६७५आहे. कोरोनाबाधित एकूण १६८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच ११९ रुग्ण गंभीर असून उर्वरित निरीक्षणाखाली आहेत.

राज्य सरकारच्या निर्णयानंतर पुण्यातील औद्योगिक क्षेत्र काहीसं पूर्वपदावर येऊ लागले आहे. जिल्ह्यात ३५७९ लघू आणि मोठे उद्योग सुरु झाले आहेत. दोन लाख ६९ हजार ५७२ कामगार कामावर रुजू झाले आहेत. सातारा जिल्हयातील १२१ कोरोना बाधीत रुग्ण असून ३५ बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. अ‍ॅक्टीव रुग्ण संख्या ८४आहे. कोरोनाबाधित एकूण २ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या २४ हजार ४२७ झाली आहे. आज १०२६ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. राज्यात आज ३३९ कोरोना बाधित रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत राज्यभरात ५१२५ रुग्ण बरे झाले आहेत. अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी काल (१२ मे) दिली.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुख्यमंत्र्यांची राज्यातील सर्वपक्षीय राजकीय नेत्यांसमवेत बैठक

News Desk

देशात १९९३ नव्या कोरोनाबाधितांची नोंद

News Desk

पंतप्रधान मोदींच्या पश्चिम बंगालमध्ये उद्या आयोजित सर्व सभा रद्द

News Desk