HW News Marathi
महाराष्ट्र

भारतात उत्पन्नातील ४५ टक्के होतात सिगरेटवर खर्च!

अमरावती : देशात नियमित धुम्रपान करणाऱ्यांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. विशेष म्हणजे मध्यम वर्गीय कुटुंबातील धुम्रपान करणारी एक व्यक्ती उत्पान्नातील सरासरी १५ टक्के वाटा धूम्रपानावर खर्च करते. तसेच धुम्रपानामुळे होणाऱ्या आजारांवरीलउपचारांवर त्यांच्या उत्पन्नाचा ३० टक्के वाटा खर्च होत असल्याचेही एका सर्वेक्षणातून उघडकीस आले आहे.

भारतीयांना टीबी होण्याची दोन मुख्य कारणे आहेत. त्यापैकी एक प्रदूषण, तर दुसरे धूम्रपान आहे. धूम्रपानामुळे दमा,अस्थमा, सीओपीडी (क्रोनिक आॅब्सेटरी पल्मोनरी डीसिज), क्षयरोग, फुफ्फुसाचा कॅन्सर, मुखरोग, अन्ननलिकेचा कॅन्सर आदी आजारहोतात. तसेच व्यक्तीचे आयुष्यमान सहा ते दहा वर्षांनी कमी होते. तसेच धूम्रपान करणा-या व्यक्तीच्या घरातील सदस्यांची प्रतिकारशक्तीही कमी होत असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

धुम्रपानासाठी ८० टक्के लोक सिगरेटचा, तर १५ टक्के विडीचा वापर करतात. तसेच ५ टक्के लोक हुक्का, चिलम आदी साधनांचा वापर करतात. ‘इंडियन इन्स्टिट्यूट फॉर पॉप्युलेशन सायन्सेस’ या संस्थेच्या सर्वेक्षणानुसार धुम्रपानामुळे दरवर्षी ५ टक्के लोकांचा मृत्यू होतो. यात ११.१ टक्के पुरुष, तर ४.५ टक्के महिलांचे प्रमाण आहे. दरम्यान, २०३० सालापर्यंत धूम्रपान हे मृत्यूसाठी प्रमुख तिसरे कारण ठरणार असल्याचेही या सर्वेक्षणातून स्पष्ट झाले आहे.

कोट

भारतात धूम्रपानामुळे मृत्यूचे प्रमाण अधिक आहे. सार्वजनिक ठिकाणी पॅसिव स्मोकिंगमुळे धुराद्वारा इतरांनाही फुफ्फुसाचा आजार बळावतो. याकडे तातडीने लक्ष देण्याची गरज आहे.

– मनोज निचत,

हृदयरोग, मधुमेहतज्ज्ञ, श्रीकृष्ण हॉस्पिटल, अमरावती

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड अपघातातून थोडक्यात बचावले!

News Desk

‘राज्यात जे सध्या सुरु आहे ते विरोधकांच्या नैराश्याचं प्रतिक’, सरनाईकांवरील कारवाईवर पवारांची प्रतिक्रिया 

News Desk

चंद्रकांत पाटलांनी संभाजीराजेंना उपकाराची आठवण करुन दिली – संजय राऊत

News Desk