नागपूर | कोरोनाचा संसर्ग झपाट्याने फैलावत आहे आणि या मुळे लोकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण पसरले आहे. मेयो हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असलेले कोरोनाचे ५ संशयित रुग्ण पळाल्याने खळबळ उडाली. ही घटना आज (१४ मार्च) पहाटे उघडकीस आली. रुग्ण पळाल्याने पोलिस आणि मेयो प्रशासनात प्रचंड गोंधळ उडाला आहे.
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एका स्वतंत्र वॉर्डात संशयित रुग्णांना ठेवण्यात आले होते. आज पहाटे या वॉर्डात कोरोनाची लागण झालेला रुग्ण असल्याची अफवा पसरली आणि रुग्णांमध्ये खळबळ उडाली. त्यानंतर संधी साधून एका मागून एक असे चार रुग्ण वॉर्डातून पळून गेले. मेयो प्रशासनाला ही बाब लक्षात येताच खळबळ उडाली. तातडीने पोलिसांना माहिती देण्यात आली व रुग्णांच्या नातेवाईकांच्या मोबाईलवर संपर्क साधण्यात आला.
दरम्यान, पोलिसांना पाचपैकी तिघेजण त्यांच्या घरी आढळून आले. हे सर्वजण स्वच्छतागृहाला जाण्याच्या कारणाणे एकापाठोपाठ एक रुग्णालयातून बाहेर पडले, अशी माहिती पोलिसांनी दिली. या ५ संशयितांमध्ये घरकाम करणाऱ्या एका महिलेचाही समावेश आहे.
Nagpur: 5 #COVID19 suspects escaped from isolation ward of Mayo Hospital. S Suryavanshi, Sub-Inspector Nagpur police station says, "One of them had tested negative, reports of other 4 were awaited. We have traced them & they will be brought back to hospital by the administration" pic.twitter.com/GOsOLfzrcs
— ANI (@ANI) March 14, 2020
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.