HW News Marathi
देश / विदेश

#coronavirus : राज्यात आज ६ नवे रुग्ण, कोरोनाबाधितांची संख्या १५९ वर

मुंबई | महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांचा आकड्यात दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. राज्यात कोरोनाबाधितांची संख्या आता १५९ वर गेली आहे. त्यापैकी मुंबईत ५ आणि नागपूरमध्ये १ असे ६ नवे रुग्णांची नोंद झाली आहे. तर कोरोनामुळे ५ जणांचा मृत्यू झाला आहे. तर देशभरात कोरोनाचे कोरोनबाधितांची संख्या ८३४ वर पोहोचली असून देशात कोरोनामुळे २० जणांचा मृत्यू झाला आहे.

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभरात लॉकडाऊन घोषित करण्यात आला असून आज (२८ मार्च) लॉकडाऊनचा चौथा दिवस आहे. सर्वच प्रवासी साधने बंद असल्याने लोकांनी पायी घरी जाण्यास सुरुवात केली आहे. आजपर्यंत भरती करण्यात आलेल्यापैकी ३०५९ जणांचे प्रयोगशाळा नमुने कोरोना निगेटिव्ह आले आहेत. तर १५९ जण पॉझिटिव्ह आले आहेत. आतापर्यंत २२ कोरोना बाधित रुग्णांना ते बरे झाल्यानंतर रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे.

राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या

  • मुंबई – ५६
  • पिंपरी चिंचवड – १३
  • पुणे – १९
  • सांगली – २४
  • नवी मुंबई – ६
  • कल्याण-डोंबिवली – ६
  • नागपूर – १०
  • ठाणे – ५
  • यवतमाळ – ४
  • अहमदनगर – ३
  • सातारा – २
  • कोल्हापूर – १
  • पनवेल – २
  • उल्हासनगर – १
  • औरंगाबाद -१
  • रत्नागिरी – १
  • वसई-विरार – १
  • सिंधुदुर्ग – १
  • गोंदिया – १
  • गुजरात – १

एकूण – १५९ कोरोनाबाधितांची संख्या

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मोहम्मद शमीने केले धक्कादायक खुलासे !

News Desk

अयोध्या प्रकरणी २६ फेब्रुवारीला सर्वोच्च न्यायालयात सुनावणी

News Desk

तामिळनाडूत सत्तापालट करणाऱ्या ‘एम के स्टॅलिन’बद्दल ‘या’ गोष्टी माहिती आहेत का?

News Desk