HW News Marathi
Covid-19

अमरावती जिल्हयात ७ दिवसांचा लॅाकडाऊन ,महाराष्ट्रात काय होणार ?

अमरावती | महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये कडक नियमांची अंमलबजावणी करण्यात आलेली आहे. पुण्यात रात्रीची संचारबंदी घोषित करण्यात आलेली आहे. अमरावतीमध्ये उद्या म्हणजे सोमवारी २२ फेब्रुवारी सायंकाळी 8 वाजल्यापासून पुन्हा लॉकडाऊन लागू करण्यात येणार असल्याचं जाहीर करण्यात आलं आहे. हा ७ दिवसांचा लॅाकडाऊन असणार आहे.

राज्यात सध्या अमरावती विभाग हा कोरोनाचा हॉटस्पॉट ठरत आहे. अमरावती जिल्ह्यात कोरोना रुग्णझपाट्याने वाढत असल्याने हा निर्णय घेण्यात आल्याचं सांगितलं जात आहे. काल दिवसभरात अमरावती मध्ये १००० पेक्षा जास्त रूग्ण वाढले आहेत.या सगळ्या पार्श्वभूमिवर प्रशासन अधिक अलर्ट झाले आहे. अमरावतीच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी ही लाॅकडाऊनची घोषणा केली आहे. अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयात बैठकी दरम्यान हा निर्णय घेण्यात आला.

आज सायंकाळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राज्यातील जनतेशी संवाद साधणार आहेत.त्यामुळे संपुर्ण राज्यात लाॅकडाऊनचा निर्णय होणार का ? कोरोनाच प्रादुर्भाव रोखण्यासाठी काय उपाययोजना केल्या जाणार याकडे संपुर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

अमरावतीतील अनेक भागांमध्ये कोरोनाची रुग्णसंख्या वाढत आहे. येथे एक आठवड्याचा लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. अमरावतीतील 60 टक्के भागात कोरोनाचा प्रसार होत असल्याचं वृत्त समोर आले होतं. त्यानंतर कोरोनाची वाढलेली रुग्णसंख्या पाहता येथे पुढील 8 दिवसांचा लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. यादरम्यान नागरिकांच्या लॉकडाऊनच्या नियमांचा पालक करणे बंधनकारक असणार आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

देशातील कोरोना रुग्ण संख्या घटली!

News Desk

उद्धव ठाकरेच Best CM! कोरोनाची दुसरी लाट प्रभावीपणे हाताळणारे मुख्यमंत्री म्हणून पहिली पसंती

News Desk

देशात कोरोनाबाधितांची संख्या २१ हजाराहून अधिक, तर आतातपर्यंत ६८१ जणांचा कोरोनामुळे मृत्यू

News Desk