मुंबई | राज्यात कोरोना रुग्णांची संख्या ३० हजार ७०६ झाली आहे. आतापर्यंत राज्यभरात ७०८८ रुग्ण बरे झाले आहेत. तर मुंबई शहर व उपनगरात गेल्या २४ तासांत करोनाचे ८८४ नवीन रुग्ण आढळले आहेत तर २३८ रुग्ण करोनावर मात करून घरी परतले आहेत. तर आता एकट्या मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या १८ हजार ३९६ वर पोहोचली आहे. या दिलासादायक बाब म्हणजे आतापर्यंत मुंबईत ४ हजार ८०६ रुग्णांनी करोना मात केली आहे.
884 new #COVID19 positive cases reported in Mumbai today, taking the total number of cases to 18396.
238 patients recovered&discharged today, while 4806 patients have discharged till date. Death toll stands at 696: Municipal Corporation Greater Mumbai pic.twitter.com/aFcdf2DsYD— ANI (@ANI) May 16, 2020
मुंबईत गेल्या २४ तासांत २७ रुग्णांचा मृत्यू आहे तर अन्य १४ रुग्णांचे मृत्यू ७ मे ते १२ या कालावधीतील आहेत. त्यांचा अहवाल आज प्राप्त झाला आहे. ४१ मृतांपैकी २४ रुग्णांमध्ये दीर्घकालीन आजार होते. तसेच ४१ मध्ये २६ रुग्ण पुरुष तर १५ रुग्ण महिला होत्या. मृत रुग्णांपैकी दोघांचे वय ४० वर्षांखालील होते तर २७ रुग्ण ६० वर्षांवरील होते. उर्वरित १२ रुग्ण ४० ते ६० वर्षे यादरम्यानचे होते, असे मुंबई महापालिका आरोग्य विभागाच्या अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.