HW News Marathi
महाराष्ट्र

औरंगाबादेत कोरोनाग्रस्त महिलेने दिला गोंडस बाळाला जन्म…

औरंगाबाद | औरंगाबादेतील कोरोनाग्रस्त ३३ वर्षीय गर्भवतीने जिल्हा सामान्य रूग्णालयात (मिनी घाटी) काल (१८ एप्रिल) एका गोंडस बाळाला दुपारी १२.४० वा.जन्म दिला. त्याचबरोबर चौदा दिवस पूर्ण करणाऱ्या नऊ कोरोनाग्रस्तांपैकी आठ जणांचे पहिल्या चाचणीच्या लाळेचे नमुने (स्वॅब) निगेटीव्ह आल्याने दुसऱ्या चाचणीकरिता त्यांचे स्वॅब घेण्यात आलेले आहेत, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुंदर कुलकर्णी यांनी दिली.

गरोदर महिलेचे यशस्वी अशी सिझेरियन शस्त्रक्रिया स्त्री रोग तज्ज्ञ डॉ.कमलाकर मुदखेडकर, स्त्री रोग तज्ज्ञ डॉ.कविता जाधव, भूल तज्ज्ञ डॉ. पी.एम. कुलकर्णी, बालरोग तज्ज्ञ डॉ. भारती नागरे, परिचारिका सुरेखा ढेपले, ज्योती दारवंटे, आशा मेरी थॅामस व दोन चतुर्थ श्रेणी कर्मचारी या चमूने केली. शस्त्रक्रिया गृहामध्येच (ऑपरेशन थिएटर) बाळाचे तीन स्वॅब तपासणीसाठी घेतले. याच महिलेच्या १५ वर्षीय मुलाची चाचणी शुक्रवारी (१७ एप्रिल) रात्री पॉझिटिव्ह आलेली आहे.

मिनी घाटीमध्ये ६१ रूग्णांची काल तपासणी करण्यात आली. त्यातील ११ जणांना घरीच अलगीकरणात (होम क्वारंटाइन) राहण्याचा सल्ला दिला. २३ जणांना भरती करून घेतले आहे. एकूण २६ स्वॅब घेऊन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयात (घाटी) पाठविले आहेत. शुक्रवारी (१७ एप्रिल) आणि शनिवारी (१८ एप्रिल) पाठविलेल्या स्वॅबपैकी चार जणांचे अहवाल देखील निगेटीव्ह आलेत. त्यांनाही औषधी देऊन घरी पाठविले आहे. ३७ जणांच्या स्वॅबचे रिपोर्ट येणे प्रतिक्षेत आहे. सध्या मिनी घाटीतील कोविड १९ विलगीकरण कक्षात एकूण २३ जणांवर उपचार सुरू आहेत. चौदा दिवस पूर्ण करणाऱ्या एका रूग्णाचा पहिला स्वॅबचा अहवाल मात्र पॉझिटिव्ह आलेला आहे.

जिल्ह्यात आजपर्यंत २९ कोरोनाबाधित रुग्ण आढळलेत. त्यापैकी दोन रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आजच्या ६५ वर्षीय महिलेच्या मृत्यूसह एकूण तीन रूग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. मिनी घाटीत २३, खासगी रुग्णालयात एक अशा एकूण २४ कोरोनाबाधितांवर विलगीकरण कक्षात उपचार सुरू आहेत, असेही कुलकर्णी म्हणाले.

घाटीत वृद्ध महिलेचा मृत्यू

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयात (घाटी) कोविड 19 (कोरोना) पॉझिटिव्ह असलेल्या शहरातील ६५ वर्षीय महिलेचा आज सकाळी ६.५० वाजता उपचारादरम्यान मृत्यू झाला. या महिलेची प्रकृती चिंताजनक होती. त्यांना १३ एप्रिल रोजी घाटीत भरती केले होते. त्यांची कोविड चाचणी १६ रोजी पॉझिटिव्ह आली होती. एका खासगी रुग्णालयातून घाटीत या महिलेस संदर्भित केले होते. न्यूमोनिया, मधुमेह व उच्च रक्तदाब या आजाराचा त्यांना त्रास होता, असे घाटीचे नोडल अधिकारी (माध्यम समन्वयक) डॉ. अरविंद गायकवाड यांनी सांगितले.

घाटीत काल १७ रूग्णांची तपासणी झाली. यापैकी तिघांचे स्वॅब प्रयोगशाळेस पाठवले. दोघा जणांचा स्वॅब रिपोर्ट येणे बाकी आहे. दोन कोविड संशयित, २३ कोविड निगेटीव्ह असे एकूण २५ रूग्ण घाटीत भरती आहेत. यापैकी एका संशयित कोविड रुग्णाची प्रकृती गंभीर असल्याचेही डॉ. गायकवाड म्हणाले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

ईडी पान-तंबाखूचं दुकान झालंय…भाजपविरोधात बोलल्याने उद्या माझ्याही घरी ईडी येऊ शकते

News Desk

अनिल देशमुखाना मोठा दिलासा! जामीनाविरोधातील CBIची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली

Aprna

विधानसभा निवडणुकीत सरकार स्थापन करणारे तुमचे बाप कोण आहेत हे संपूर्ण महाराष्ट्राला माहीत आहे 

News Desk