HW News Marathi
महाराष्ट्र

तुळजापूर तालुक्यातील सांगवी मार्डीमध्ये ५ वर्षीय अल्पवयीन बालकाची निर्घृण हत्या

उस्मानाबाद | उस्मानाबाद जिल्ह्यातील तुळजापूर तालुक्यातील सांगवी मार्डी येथे ५ वर्षीय अल्पवयीन बालकाची निर्घृण हत्या झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या हत्येमागचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. या हत्येचा तपास तुळजापूर पोलीस करत आहेत. या ५ वर्षीय अल्पवयीन बालकाच्या शरीरावर जखमा असून त्याचा गळा दाबून हत्या केल्याची प्राथमिक मिळाली आहे.

या अल्पवयीन बालकाचे नाव ओम मनोज बागल असून तो काल (१६ डिसेंबर) तापाची गोळी आणण्यासाठी घराबाहेर गेला होता. खूप वेळ होऊ नही तो घर न परतल्यानंतर त्यांच्या कुटुंबियांनी सर्वत्र त्यांचा शोध सुरू केला. पण तो त्यांना सापडला नाही. यानंतर आज (१७ डिसेंबर) मुलांची घराशेजारी असलेल्या एका घरात मृत अवस्थेत सापडला. या घटनेनंतर गावात एकच खळबळ उडाली.

अल्पवयीन बालकाचे मृतदेह सापडला त्यावेळी त्यांच्या दोन्ही कानात सोन्याची बाळी होत्या आणि त्या देखील गायब असल्याची माहिती पोलिसांनी दिली. या अल्पवयीन बालकाची हत्या मागे कोणते कारणा आहे. हे अद्याप स्पष्ट झाले असून पोलिसांनी घटनास्थळी डॉग्स स्कॉडला पाचारण करण्यात आले.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कृषीतज्ञ शरद पवारांचे फडणवीसांकडून कौतुक, तर महाराष्ट्र सरकारवर गंभीर आरोप !

News Desk

मुख्यमंत्र्यांना सर्वोच्च न्यायालयाचा दणका

News Desk

निलेश राणेंकडून अजित पवारांच कौतुक तर मुख्यमंत्र्यांवर टीका

News Desk