HW News Marathi
Covid-19

शरद पवार, उध्दव ठाकरे, अजित पवारांचे फोटोज मॉर्फ केल्याप्रकरणी पुण्यात १३ जणांवर गुन्हा दाखल

मुंबई । सोशल मीडियावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार व राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची बदनामी केल्याप्रकरणी काही तरुणांना पुणे पोलिसांनी १३ जणांवर गुन्हा दाखल केला आहे. फोटोज मॉर्फ करुन फेसबुक, ट्विटर या सोशल मीडियावर बदनामी केल्याप्रकरणी पुणे पोलिसांकडून ही कारवाई करण्यात आली आहे.आकाश शिंदे यांनी पुण्यातील सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.

कोणाकोणावर गुन्हा दाखल?

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार व राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे फोटो मॉर्फ करुन बदनामी केल्याप्रकरणी एकूण १३ जणांवर गुन्हा दाखल झाला आहेत. नाना पंडित, वैभव पाटील, महेश गहुडले, धनंजय जोशी, सोनाली राणे, जयसिंग मोहन, संदीप पाटील, शौर्यन श्रीकृष्ण चोरगे, अतुल अयाचित, राजेंद्र पवार, राज पाटील, मुकेश जाधव, स्वरूप भोसले यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आले आहेत.

फडणवीसांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य, नाशिकमध्ये ५ जणांविरोधात तक्रार

देवेंद्र फडणवीसांच्या नाशिक येथील हॉस्पिटल पाहणी दौऱ्यादरम्यान देखील काही जणांनी फडणवीस यांचा व्हिडीओ शूट करत त्यांच्यावर अत्यंत आक्षेपार्ह टिपण्णी केली होती. या प्रकरणी देखील नाशिक रोड पोलीस ठाण्यात ५ जणांविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्यात आज 56 हजारांहून अधिक कोरोनाबाधितांची वाढ

News Desk

‘लस घेतल्याचा फोटो काढून नौटंकी करायला मला आवडत नाही’अजित पवारांचा टोला!

News Desk

केरळात कोरोना रुग्णांमध्ये वाढ!

News Desk