HW News Marathi
महाराष्ट्र

राणा दाम्पत्यासह १४ कार्यकर्त्यांवर रात्री उशिरापर्यंत लाऊडस्पीकर लावल्यामुळे गुन्हा दाखल

मुंबई। आमदार रवी राणा आणि त्यांची पत्नी खासदार नवनीत राणा यांच्यासह १४ कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राणा दाम्पत्यांनी काल (२८ मे) रात्री उशिरापर्यंत लाऊडस्पीकर लावून ध्वनी प्रदूषण त्यांच्यावर राजापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. अमरावती काल राणा दाम्पत्यांचे स्वगतासाठी त्यांच्या कार्यकर्त्यांनी एक क्विंटलचा हार घातला असून त्यांचा राणा दाम्पत्याचा दुग्धाभिषेक करण्यात आला.

राणा दाम्पत्य हे अमरावती ३६ दिवसांनी परतल्यामुळे मोठ्या जल्लोषात त्यांचे स्वागत करण्यात आले. अमरावतीत रात्री १२ वाजेपर्यंत लाऊडस्पीकरवर हनुमान चालिसा पठाण आणि आरती सुरू होती. लाऊडस्पीकरला रात्री १० वाजल्यानंतर परवानगी नसता नाही तरी देखील ते सुरू होते. यामुळे राणा दाम्पत्यानी 341, 188, 134, 135 कमल 15 पर्यावरण संवर्धन अधिनियम 1986 आयपीसी अंतर्गत राजापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

राणा दाम्पत्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री या निवासस्थानासमोर हनुमान चालिसा पठाण करण्याचा निर्णय घेतला होता. परंतु, शिवसैनिकांनी राणा दाम्पत्यांना त्यांच्या खार या निवासस्थानी थांबल होते. यानंतर मुंबई पोलिसांनी राणा दाम्पत्यांना ताब्यात घेतल्यानंतर १४ दिवस तुरुंगात होते. यानंतर दिल्लीत जावून मुख्यमंत्र्यांची तक्रार ही दिल्लीत केंद्रीय मंत्री अमित शहा आणि लोकसभा अध्यक्ष ओम प्रकाश बिर्ला यांनी भेट घेतली. राणा दाम्पत्यांनी हनुमान जयंतीने दिल्लीच्या मंदिरात हनुमान चालिसा पठाण केली. यानंतर तब्बल ३६ दिवसांनी राणा दाम्पत्य अमरावतीमध्ये दाखल झाले होते. 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Maharashtra Budget 2021-22 : समृद्धी महामार्ग, नाशिक-मुंबई मार्गावर मेगा इलेक्ट्रीक चार्जिंग सेंटर उभारणार

News Desk

पालघरमधील ११ हॉटेल्स होम कोरोंटाईन करणाऱ्यांसाठी राखीव

swarit

पूरग्रस्तांना दिलेले चेक परत घेतले गेले! अनिल परब म्हणाले…

News Desk