HW News Marathi
महाराष्ट्र

परळी काॅंग्रेस शहराध्यक्षांसह जवळपास २५ जणांवर सरकारी कामात अडथळा आणल्या प्रकरणी गुन्हा दाखल

बीड | महसूल प्रशासन काम करताना पक्षपातीपणा करत असल्याचा आरोप करीत काल काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते संतप्त होऊन त्यांनी तहसील कार्यालयात आक्रमक आंदोलन केले. या आंदोलना दरम्यान नायब तहसीलदार रुपनर यांच्या दालनात बेशरम फेकले. या प्रकरणाने नविन वळण घेतले आहे.या पार्श्वभूमीवर परळी काॅंग्रेस शहराध्यक्षांसह जवळपास २५ ते ३० कार्यकर्त्यांवर सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलीस सूत्रांकडून प्राप्त अधिक माहिती नुसार, कालीदास कोंडीराम पवार वय 55 वर्ष जात महादेव कोळी व्यवसाय नौकरी अव्वल कारकुन तहसील कार्यालय परळी वै रा. बजरंग नगर परळी यांनी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.यानुसार काल (२९ मार्च) रोजी 12.00 वाजेच्या सुमारास तहसील कार्यालय परळी वै. येथे ना.तहसीलदार रुपनर यांचे दालनात असता तेथे ते शासकीय काम करीत असतांना आरोपींनी गैरकायदयाची मंडळी जमवून नायब तहसीलदार यांचे शासकीय कामात अडथळा करून नायब तहसीलदार यांच्या अंगावर व दालनात बेशरमाचे फुल, फाटे, कचरा टाकला.आमचे कामे करीत नाही तुम्ही बेशरम अधीकारी आहेत.

तसेच नायब तहसीलदार, महसुल अधीकारी मुर्दाबाद अशा घोषणा दिल्या व शासकीय कामात अडथळा निर्माण केला. या प्रकरणी बहादुरभाई (काँग्रेस शहर अध्यक्ष परळी) , गणपत अप्पा कोरे, शेख जमील शेख लाल ,शेख असलम फाशा, सय्यद मकसुब गुत्तेदार, सय्यद युनुस स.मंजुर, शिवाजी देशमुख,बद्रोद्दीन बाबुमियाँ शेख , प्रकाश लक्ष्मणराव देशमुख ,सुभाष देशमुख ,शेख अमजद लत्तीफ, रंजीत रामराजे देशमुख सर्व रा. परळी वै.व ईतर 15 ते 18 अनोळखी लोकांविरुद्ध गुरनं 54/2022 कलम 353,143, 506, भादवी प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास परळी शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक उमाशंकर कस्तुरे हे करीत आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘माथाडी कामगारांना अजून 20 हजार लस देणार’, देवेंद्र फडणवीसांचं आश्वासन!

News Desk

देवेंद्र फडणवीसांनी कोल्हापूर दौऱ्यानंतर मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून ‘या’ केल्यात मागण्या!

News Desk

भाजपने निवडणुकीपूर्वीच आत्मविश्वास गमावला, उमेदवारीच्या गोंधळावरून मुंडेंचा विरोधकांना टोला

News Desk