मदुराई | देशात कोरोनाचा संसर्ग वेगाने वाढत आहे. कोरोनाच्या मगरमिठीतून बाहेर काढण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी २१ दिवस संपूर्ण देश लॉकडाऊन करण्याची घोषणा केली आहे. देशात कोरोना व्हायरसचे ५६२ रुग्ण आढळून आले आहेत. कोरोनामुळे तामिळनाडूत एकाचा कोरोना रुग्णाचा मृत्यू झाला आहे. करोनामुळे तामिळनाडूत पहिला बळी गेला असून देशातील करोनामुळे रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. आता देशात कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्याची संख्या आता ११वर गेला आहे.
A #COVID19 positive patient who was admitted at Rajaji Hospital in Madurai, Tamil Nadu has passed away.He had medical history of prolonged illness with steroid-dependent COPD, uncontrolled diabetes with hypertension: Dr C Vijayabaskar, State Minister for Health and Family Welfare pic.twitter.com/K14MPLRNs1
— ANI (@ANI) March 24, 2020
तामिळनाडूत एकूण १८ जणांना करोनाची लागण झाली आहे. त्यापैकी आज (२५ मार्च) एकाचा मृत्यू झाला तर एक रुग्ण बरा झाला आहे. तामिळनाडूतील मदुराई येथील राजाजी रुग्णालयात या ५४ वर्षीय रुग्णाचा मृत्यू झाला आहे. या व्यक्तीस २३ मार्च रोजी राजाजी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र, या रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. तसेच या रुग्णाला मधूमेह आणि हायपरटेन्शनचा त्रास होता. हा रुग्ण परदेशातून आला होता, असे सूत्रांनी माहिती दिली आहे.
संपूर्ण देश २१ दिवसांसाठी लॉकडाऊन
कोरोना संसर्ग रोखण्यासाठी संपूर्ण देशभरात पुढील २१ दिवस लॉकडाऊन करण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदींना काल (२५ मार्च) केली. जर या २१ दिवसांत कोरोनाचे संसर्ग रोखले नाही तर मोठा अनर्थ होईल, अशीही भीतीही त्यांनी देशवासियांना संबोधित करता व्यक्त केली. लोकांनी घाबरण्याचे कारण नाही पण काळजी घ्यावी, घराच्या बाहेर पडू नये. स्वत:चे आणि कुटुंबाचे आरोग्य तुमच्याच हाती आहे असे, आवाहन पंतप्रधानांनी केलं होतं.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.