HW News Marathi
महाराष्ट्र

बेस्ट प्रशासनाचा डबल डेकर घोटाळा!

मुंबई | बेस्टच्या ताफ्यात दोनशे दुमजली बसगाड्यांचा प्रस्ताव आणून प्रत्यक्षात बेस्ट समितीने भाडेतत्त्वावर ९०० बसगाड्यांचा कार्यान्वित करण्याचा निर्णय घेतला. बसगाड्यांची संख्या वाढविल्यानंतर कुठल्याही प्रकारची नवीन निविदा प्रक्रिया न राबवता प्रति कि.मी. ५६.४० रुपयांमध्ये हे कंत्राट देण्यात आले आहे. यामुळे बेस्टचे नुकसान झाले असून मर्जीतील ठेकेदारांची तुंबडी भरण्यात आल्याचा आरोप विरोधी पक्षाकडून केला जात आहे. या निर्णयाच्या विरोधात आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं शिष्टमंडळ उद्या (३१ जानेवारी) बेस्ट भवनावर धडकणार आहेत.

दरम्यान, या विषयावर महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेचे चिटणीस केतन नाईक यांनी बेस्ट प्रशासनाला मनसे स्टाईलमध्ये इशारा दिला आहे. केतन नाईक यांनी निवेदनात असे म्हटले आहे की, ‘निवडणुका म्हणजे सर्वकाही नसतं. चांगल्याला चांगलं म्हणायला हवं ही राज साहेब ठाकरेंची शिकवण. पण आमच्या मुंबई महानगरपालिकेतील सत्ताधारी पक्ष जे काही करतात ते निवडणुका डोक्यात ठेऊनच. निवडणुका जवळ आल्या की यांना उर्दू भवन, टिपू, मराठी पाट्या हे सर्व काही सुचतं. याचेच उत्तम उदाहरण म्हणजे नव्याने मागवण्यात आलेल्या डबल डेकर बस गाड्यांचे टेंडर.

२०० इलेक्ट्रिक वातानुकूलित दुमजली बसगाड्या (Double Decker A.C Busses) पुरवठा करण्याचे टेंडर प्रसिद्ध करून मर्जीतल्या कंपन्यांना परस्पर कुठल्याही नव्या टेंडरविना ४०० बसेसची संख्या वाढवून देण्यात येत आहे’.

इतकेच नव्हे तर प्रसारमाध्यमांतुन मुंबईला ९०० इलेक्ट्रिक डबल डेकर बसेस मिळणार असे सांगून खोटी प्रसिद्धी मिळवली जात आहे. बेस्टच्या सर्वच बसगाड्या इलेक्ट्रिक होऊन मुंबईच्या प्रदूषणावर नियंत्रण येणार असेल तर ते सर्व मुंबईकरांना हवंच आहे. परंतु बेस्ट प्रशासनाच्या माध्यमातून सत्ताधारी पक्ष जनतेच्या करातून जमा होणाऱ्या निधीचा वापर आपल्या मर्जीतल्या कंपन्यांना वाट्टेल तसा वाटणार असेल तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना शांत बसणार नाही असे मनसेने म्हटले आहे.दरम्यान, मा. लोकेश चंद्रा यांना लिहिलेल्या निवेदनात त्यांनी अशी विनंती देखील केली आहे की, नव्याने निविदा प्रक्रिया राबवून जनतेच्या करातून उत्पन्न झालेल्या निधीचा योग्य वापर करावा’.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

चांगलं काम करणाऱ्यालाच तिकीट; राज ठाकरेंनी घेतली शाखाध्यक्षांची शाळा!

News Desk

धुळे जिल्ह्यातील भाजप कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादीत जाहीर प्रवेश…

News Desk

गोपीचंद पडळकर आज भाजपमध्ये, काँग्रेसच्या ६ आमदारांचा प्रवेश लांबणीवर

News Desk