मुंबई | अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील अंतरवाली येथून एका मुलीचे अपहरण करण्यात आले. यानंतर मुलींच्या आई-वडिलांनी ६ मे रोजी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली. यावेळी पीआय बाजीराव पवार यांनी घटनेची चौकशी करण्यासाठी त्यांच्या आई-वडिलांना अश्लील शिवीगाळ करत दमदाटी करत १ लाख पंचवीस हजार रुपये वसूल केले. यामुळे पीआय बाजीराव पवार यांना निलंबित करण्याची मागणी आरोप भाजपचे नेते गोपीचंद पडळकर यांनी केला आहे.
गोपीचंद पडळकर म्हणाले, ” आम्हा धनगरांची पोरगी तीच नगर जिल्ह्यातल्या नेवासा तालुक्यातील अंतरवाली येथून अपहरण करण्यात आलं. तिच्या आई वडीलांनी ६ मे २०२२ रोजी तक्रार दाखल केल्यानंतर पीआय बाजीराव पवार यांनी घटनेची चौकशी करण्यासाठी आई वडीलांना अश्लील शिवीगाळ करित दमदाटी करत १ लाख पंचवीस हजार रूपये वसूल केले. सदर बाब मी एसपींना सांगितल्यानंतर तसा त्यांनी तक्रारकर्त्यांचा जवाबपण नोंदविलेला आहे.”
दरम्यान, “यासंदर्भात मी आज (१६ मे) गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना आपल्या माध्यमातून विनंती करतो की त्यांनी त्वरित मुलीला सुखरूप आई वडिलांच्याकडे सुपूर्द करण्याच्या कारवाईसाठी आदेश द्यावेत. आणि तात्काळ संबंधित पीआयला निलंबित करावे व मला आंदोलन करण्यास भाग पाडू नये. सरकारच्या नाकर्तेपणामुळे पुढे कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण झाली तर याला जबाबदार आपणच राहाल,” असे ते म्हणाले.
आम्हा धनगरांची पोर तीच नगर जिल्ह्यातल्या नेवासा तालुक्यातील अंतरवाली येथून अपहरण केले. पोलिसांनी मात्र तिच्याच वडिलांना दमदाटी केली. @Dwalsepatil तुम्ही कारवाई करा अन्यथा आम्ही आंदोलन केले आणि कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर याला जबाबदार आपण राहाल. @CMOMaharashtra pic.twitter.com/ltYQEWoDwu
— Gopichand Padalkar (@GopichandP_MLC) May 16, 2022
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.