HW News Marathi
Covid-19

नाशिकमधील दुर्घटनेची उच्चस्तरीय समिती नेमून चौकशी केली जाणार । छगन भुजबळ

नाशिक । कोरोनाचा फैलाव वाढत असतांना या संकटाशी एकजुटीने लढा दिला जात असतांना नाशिक महानगरपालिकेच्या झाकीर हुसेन रुग्णालयात ऑक्सिजनची गळती होऊन झालेल्या दुर्घटनेत २२ रुग्णांनी आपला प्राण गमावला असून ही घटना अतिशय दुर्दैवी असुन रुग्णालयात घडलेल्या प्रकारामुळे मन सुन्न झाले, दुःख व्यक्त करण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत अश्या भावना राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री आणि नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी आज (२१ एप्रिल) व्यक्त केल्या आहेत.
छगन भुजबळ हे आज सकाळी मुंबईहून नाशिकच्या दिशेने निघालो असतांना दुपारी १२.३० च्या सुमारास नाशिक महानगरपालिकेच्या झाकीर हुसेन रुग्णालयाच्या ऑक्सिजन टाकीमध्ये टँकरच्या माध्यमातून रिफिलिंग करत असतांना ऑक्सिजन गळतीची झाल्याची माहिती त्यांना मिळाली. त्यानंतर त्यांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन रुग्णालयाची पाहणी केली. वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून या संपुर्ण प्रकरणाची माहिती घेतली तसेच मृतांच्या नातेवाईकांशी चर्चा करून त्यांचे सांत्वन केले. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते.
छगन भुजबळ पुढे म्हणाले की, कोरोना विरुद्धचा लढा एकजुटीने लढला जात असतांना नाशिक महानगरपालिकेच्या झाकीर हुसेन रुग्णालयात घडलेली ही घटना अतिशय दुःखद घटना आहे. या रुग्णालयाची क्षमता एकूण १५० इतकी असून रुग्णसंख्या अधिक असल्याने या रुग्णालयात एकूण १५७ रुग्णांवर उपचार सुरू होते. त्यात १३१ ऑक्सिजनवर तर १५ रुग्ण व्हेंटिलेटरवर उपचार घेत होते. या रुग्णालयात उपचार घेत असलेल्या १५७ रुग्णांपैकी ६३ अतिशय आजारी होते. १२.३० सुमारास याठिकाणी गॅस गळतीची घटना घडली. त्यानंतर १.३० वाजरपर्यंत पुन्हा जोडणी करण्यात आली. या दरम्यान दुर्दैवाने यात २२ लोक मृत्युमुखी पडले असुन ११ व्हेंटिलेटरवर असलेल्या रुग्णांचा तर ११ ऑक्सिजन वर असलेल्या रुग्णांचा समावेश असल्याचे त्यांनी सांगितले.

उच्च स्तरीय समिती नेमण्यात येणार !

भुजबळ यावेळी म्हणाले की, “घटना घडल्यानंतर तातडीने याठिकाणी ड्युरा सिलेंडर व जम्बो सिलेंडर मागविण्यात येऊन रुग्णांवर उपचार करण्यात आले तर पाच रुग्णांना इतर रुग्णालयात हलविण्यात आले आहे. तर ऑक्सिजन पुरवठा सुरळीत होऊन पुन्हा एकदा रुग्णांवर योग्य ते उपचार करण्यात येत आहे. कोरोना विरुद्ध लढाई लढत असतांना ही अत्यंत दुर्दैवी घटना घडली असून राज्य शासनाकडून या घटनेचा तपास करण्यासाठी उच्च स्तरीय समिती नेमण्यात येणार.समितीमध्ये एक आयएएस अधिकारी एक इंजिनिअरिंग क्षेत्रातील तज्ञ,आणि एक सिनियर डॉक्टरचा समावेश असणार आहे”, असे त्यांनी सांगितले.
“या घटनेत मृत्युमुखी पडलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांना राज्य शासन व नाशिक महापालिका यांच्याकडून प्रत्येकी ५ लक्ष रुपयांची मदत करण्यात येईल. या घटनेची चौकशी पूर्ण झाल्यानंतर दोषी असणाऱ्यांवर योग्य ती कारवाई करण्यात येईल. आपलं काम थांबणार नाही. अधिक नियोजन करून लढा सुरू राहील. या घटनेचा धडा घेऊन अधिक दक्ष राहून काम करण्याचा प्रयत्न करण्यात येईल. या लढाईत नागरिकांनी जास्तीत जास्त सहकार्य करून आवश्यक ती काळजी घेण्याची गरज आहे”, असेही यावेळी भुजबळ यांनी सांगितले.
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्यातील कंटेन्मेंट झोनमध्ये ३१ डिसेंबरपर्यंत वाढला लॉकडाऊन

News Desk

राहुल गांधींचे विधान जबाबदारीपासून पळणारे | देवेंद्र फडणवीस

News Desk

५५ वर्षांवरील पोलीस कर्मचाऱ्यांसाठी ‘वर्क फ्रॉम होम’! – दिलीप वळसे पाटील

Aprna