HW News Marathi
महाराष्ट्र

‘त्या’ ट्वीटमुळे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी अडचणीत

मुंबई | जगभरात आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा होत असताना काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी ‘न्यू इंडिया’ अशा कॅप्शनसह लष्कराच्या डॉग युनिटचा फोटो ट्विट केला होता. राहुल गांधीच्या या ट्वीटनंतर सर्व स्तरातून त्यांच्याव टीकेची झोड उटली होती. या प्रकरणी राहुल गांधी यांच्या विरोधात आझाद मैदान पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. या प्रकरणी अटलबिहारी दुबे यांनी तक्रार दाखल केली आहे.

 

आंतरराष्ट्रीय योगा दिनानिमित्त २१ जून रोजी देशभरात योगादिन उत्साहात पार पडला.यावेळी अनेकांनी योगासने करतानाचे फोटो, व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केले होते. त्याचप्रमाणे राहुल गांधींनी सुद्धा आपल्या ट्विटर अकाऊंटवरून ‘न्यू इंडिया’ अशा कॅप्शनसह लष्कराच्या डॉग युनिटचा फोटो ट्विट केला होता. त्यानंतर राहुल गांधी हे सोशल मीडियावर खूप ट्रोल झाले.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

देवेंद्र फडणवीस यांचा मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा, घोडेबाजारांचे राजकारण करणार नाही !

News Desk

पोलिसांच्या आहार भत्त्यात वाढ

News Desk

बिहारच्या विषयावरुन शिवसेनेची भूमिका दुटप्पी – प्रविण दरेकर

News Desk